नेमकं काय काय घडलं?
मंगळवेढ्यात राहणाऱ्या 21 वर्षीय किरणचं नुकतंच लग्न झालं होतं. पण लग्नानंतर तिचं सासरी मन लागेना. त्याचवेळी दीर निशांत तिला भेटला अन् दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. दोघांना एकत्र रहायचं होतं पण कसं? कुटूंबाचा विरोध अन् गावात काय म्हणतील, याची सामाजिक दबावाची त्यांना चांगलीच कल्पना होती. त्यामुळे त्यांनी एक डाव आखला आणि एकत्र येण्याची प्लॅनिंग सुरू केली. किरणने आत्महत्या केल्याचा बनाव करायचा, असं ठरवण्यात आलं. त्यासाठी दोघांनी फुल प्रुफ योजनेचा आराखडा तयार केला.
advertisement
किरणला मृत दाखवायचं असेल तर एका मानसिक आजारी महिलेचा शोध घेतला पाहिजे, असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर 14 जुलै रोजी त्यांना एक संधी मिळाली. पंढरपूरमध्ये एक वेडसर महिला निशांतला पंढरपूरमध्ये दिसली. याच महिलेला टार्गेट करायचं असं निशांतने ठरवलं. काम धाडसाचं होतं, पण किरणसाठी ऐवढं करायचं असं निशांतने ठरवलंच होतं.
पंढरपुरात भेटलेल्या वेडसर महिलेला घरापर्यंत आणण्यासाठी, महिलेला कॉल केला अन् तुमच्या मुलाने किरणशी लग्न केलं. तुम्ही इथं त्याला भेटायला या, असं सांगितलं. महिला आल्यानंतर तिचा गळा दाबून हत्या केली. महिलेची बॉडी कडब्याच्या गंजीत जाळून टाकला. किरणने आत्महत्या केली, असं भासवलं अन् दोघांनी तिथून पळ काढला. पण जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना थोडा संशय आला.
किरणने तिचा मोबाईल देखील गंजीत जाळून टाकला होता. मात्र, पोलिसांनी मोबाईलच्या सीडीआरवरून माहिती काढली अन् पोलिसांचा संशय अधिकच बळावला. किरण सातत्याने दीर निशांतला फोन करायची, असं दिसून आलं. सहसा दिरासोबत वहिणीचं बोलणं कमी असतं, म्हणून पोलिसांनी निशांतला ताब्यात घेतलं अन् कसून चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर निशांतने सगळं सत्य सांगितलं.
पोलिसांनी निशांतला व्हिडीओ कॉल करायला सांगितलं. निशांतचा फोन आला म्हणून आनंदात किरण उचलायला गेली अन् समोर मृत म्हणून गावभर चर्चा झालेली किरण व्हिडीओ कॉलवर समोर दिसली. पोलिसांनी संशय येऊ दिला नाही अन् सातारा जिल्ह्यातील कराड इथं लपलेल्या किरणच्या मुसक्या आवळल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड आणि त्यांच्या टीमने 24 तासाच्या आत या गुन्ह्याचा तपास लावला आहे.