TRENDING:

Solapur : ट्रॅक्टरमध्ये चढताना गिअर पडला, दोन बहिणींचा चाकाखाली चिरडून अंत, चालकावर गुन्हा दाखल

Last Updated:

Solapur : ट्रॅक्टरखाली चिरडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टे गावात ही घटना घडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीतम पंडित, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सोलापूर : मोहोळ तालुक्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टे गावात ही घटना घडली असून या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरवर बसण्यासाठी चढत असताना गिअर पडल्यानं हा प्रकार घडला. दोन्ही मुलींच्या मृत्यूने राठोड कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आष्टे इथं उसाच्या फडात चालू ट्रॅक्टरवर बसण्यासाठी चढण्याचा प्रयत्न करताना अचानक गिअर पडला. यामुळे ट्रॅक्टर पुढे गेला आणि लहान बहिणीसह मोठी बहीण चाकाखाली चिरडल्याने दोघींचा मृत्यू झाला. निता राजु राठोड, अतिश्री राजु राठोड असे मृत झालेल्या दोन बहिणींची नावे आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातून शानुबाई राज राठोड, राजु राठोड यांच्यासह पाच भाऊ भावंडे ऊस तोडणीच्या कामासाठी आले होते.  7 डिसेंबर रोजी ऊसाच्या बांधवर असलेल्या ट्रॅक्टरमध्ये निता तिच्या लहान बहिणीला घेऊन चढण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी ट्रॅक्टरमध्ये चालक सुनिल गुलाब राठोड हा होता. तर ट्रॅक्टरमध्ये चढताना निताचा पाय गिअरवर पडला. यामुळे ट्रॅक्टर पुढे सरकला आणि दोन्ही बहिणींच्या अंगावरून गेला. यात दोघींचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात चालक सुनील राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur : ट्रॅक्टरमध्ये चढताना गिअर पडला, दोन बहिणींचा चाकाखाली चिरडून अंत, चालकावर गुन्हा दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल