मिळालेल्या माहितीनुसार, हुसेनबाशा हे आपल्या दुचाकीवरून सोलापुरातून काही सामान (बाजार) घेऊन होटगी गावाकडे जात होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेनंतर सोलापूर सिव्हिल रुग्णालयात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत. रस्त्यांवरील निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेने वाहतूक नियमांविषयी पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
advertisement
दरम्यान, अपघाताचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. जळगाव शहरातील आहुजा नगर स्टॉपजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास मोठा अपघात घडला. आहूजा नगरकडून अचानक मुंबई–नागपूर हायवेवर आलेल्या भरधाव ट्रॅक्टरला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ट्रकमधील शेकडो टन अद्रक अपघातानंतर रस्त्यावर विखुरले त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. दरम्यान, समांतर रस्त्यांचे काम सुरू असल्याने बांभोरी ते खोटे नगर स्टॉप दरम्यान या परिसरात छोटे-मोठे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सुदैवाने या घटनेत ट्रक चालक आणि क्लीनर दोघेही सुरक्षित आहेत.
