21 वर्षाच्या मेघराजचा खून
वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात रोहित आणि राहुल रघुनाथ क्षेत्रीय तसेच रोहन सुनील शिंदे यांनी मेघराजला पकडलं. प्रतिकार करण्याची त्याला संधीही मिळाली नाही. त्यांनी त्याला जबरदस्तीने फरफटत नीरा नदीच्या शांत, भयाण किनाऱ्याकडे नेलं. रात्रीच्या अंधारात, शनी घाटाच्या नीरा नदीपात्रात, क्रूरतेने त्याला बुडवून त्याचा खून करण्यात आला. 21 वर्षाच्या मेघराजला तिघांनी नदीत बुडवून मारलं.
advertisement
गुप्त जबाब, सीसीटीव्ही फुटेज अन्....
मेघराजचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी, 22 ऑक्टोबर 2025 रोजी, 7 वाजता नीरा नदीपात्रात आढळून आला आणि अकलूज हादरलं. पोलिसांनी सुरुवातीला तो अपघात असल्याचे गृहीत धरलं, पण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, हेड कॉन्स्टेबल अमोल बकाल यांनी तपास तीव्र केला. साक्षीदारांचे गुप्त जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांच्या लक्षात आलं की, हा अपघात नाही तर थरकाप उडवणारा खून आहे.
दुचाकीच्या किरकोळ कारणातून वाद
पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. सपोनि योगेश लुंगटे यांच्या नेतृत्वाखालील पथक मारेकऱ्यांच्या मागावर होते, जे घटनेनंतर फरार झाले होते. अखेर, तपास पथकाने रोहित आणि राहुल क्षेत्रीय यांना धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून, तर रोहन शिंदे याला अकलूजमधून अटक करत हा गुन्हा उघडकीस आणला. एका दुचाकीच्या किरकोळ कारणातून घडलेल्या या खुनाने मैत्री आणि विश्वासाचे धागे तोडत, अकलूजमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
