मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय महिपती अंबाजी सुरवसे यांचा त्यांच्याच 17 वर्षीय मुलाने दगडाने ठेचून खून केला. महिपती यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी 4 वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पत्नीला एक लहान मुलगी असून, सावत्र आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी, असा हट्ट दोन्ही मुले वडिलांकडे धरत होती. पण शुक्रवारी भलतंच घडलं.
advertisement
शुक्रवारी रात्री गव्हाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या मुलाला जेव्हा वडील जेवणाचा डबा देण्यासाठी गेले, तेव्हा पुन्हा याच विषयावरून दोघांमध्ये जोरात भांडण झाले. वडिलांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार देताच संतापलेल्या मुलाने महिपती यांना खाली पाडून त्यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडाने जीवघेणे वार केले.
या हल्ल्यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे महिपती यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयत महिपती यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर मुलगा तिथून पळून गेला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हा संपूर्ण थरार शेजारी राहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने पाहिला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. घटनास्थळी रक्ताने माखलेले 3 दगड पोलिसांना आढळून आले आहेत, ज्याचा वापर हा खून करण्यासाठी करण्यात आला होता.
दरम्यान, या धक्कादायक घटनेप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिपती यांची आई लक्ष्मीबाई सुरवसे यांनी फिर्याद दिली आहे. पहिल्या पत्नीपासून महिपती यांना 22 आणि 17 वर्षांचे दोन मुलगे आहेत. वडिलांवर असलेल्या रागातून मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
