"तू काही कामाची नाही"
"तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, तू दहावीला आहेस, आता तू चांगली सापडली आहेस," अशा अनेक प्रकारे पीडित विद्यार्थिनीला नराधम शिक्षक धमकावत असत. मात्र, शाळेच्या प्राचार्यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी तातडीने पीडित विद्यार्थिनीला सल्ला दिला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
गुन्हा दाखल
गंभीर प्रकाराबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसात सोलापूरमधील गुन्हेगारी देखील वाढल्याचं चित्र समोर येतंय. स्वतःला मुलं असतानाही सिद्धेश्वर मंदिर परिसरातील फिरस्त्या महिलेच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या हत्तुर वस्ती परिसरातील महिलेला आणि तिच्या साथीदाराला फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक करण्यात आली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यातील पुनवर गावात खाजगी दवाखाना चालवणाऱ्या आणि कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी नसताना उपचार करणाऱ्या एका बंगाली बोगस डॉक्टरवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली होती.
