TRENDING:

सोलापूरकरांना मिळाले तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलशाचे प्रत्यक्ष दर्शन, VIDEO

Last Updated:

तथागत गौतम बुद्ध, भंते सारीपुत्त, भंते महामोग्लायन यांचे अस्थिकलश श्रीलंकेतून पुण्यात आणण्यात आले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश महायात्रेचा आरंभ पुणे येथून 10 सप्टेंबर रोजी झाला. यानंतर मोहोळ मार्गे सोलापुरात रात्री 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास सोलापुरात या अस्थिकलश दर्शन यात्रेचे छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी
advertisement

सोलापूर : तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भंते सारीपुत्त, भंते महामोग्लायन यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेचे सोलापुरात सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आगमन झाले. ढोल- ताशांच्या गजरात 'जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है, जय भीम'चा जयघोष व पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. याबाबत नितीन गजभिये यांनी लोकल18 शी बोलताना अधिक माहिती दिली.

advertisement

तथागत गौतम बुद्ध, भंते सारीपुत्त, भंते महामोग्लायन यांचे अस्थिकलश श्रीलंकेतून पुण्यात आणण्यात आले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश महायात्रेचा आरंभ पुणे येथून 10 सप्टेंबर रोजी झाला. यानंतर मोहोळ मार्गे सोलापुरात रात्री 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास सोलापुरात या अस्थिकलश दर्शन यात्रेचे छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन झाले. अस्थिकलश दर्शनासाठी अनुयायांची गर्दी लोटली होती.

advertisement

Pune News : एक वही एक पेन उपक्रमाची सर्वत्र चर्चा, पुण्यातील हा उपक्रम नेमका आहे तरी काय?

पहिल्या रथात तथागत गौतम बुद्ध, भंते सारिपुत्त, भंते महामोग्लायन यांचे अस्थिकलश तर दुसऱ्या रथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश ठेवला होता. यात्रेसमवेत श्रीलंका येथील भंते सुमनरत्न, इंडो-एशियन मेत्ता फाउंडेशन इंडियाचे प्रमुख नितीन गजभिये (नागपूर), स्मिता वाकडे, सत्यजित जानराव, भंते बी. सारिपुत्त आणि भिक्षुणी धम्मचारिणी, भिक्षुणी खेमा महाथेरो, भिक्षुणी संघमित्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.

advertisement

4 हजार रुपयांची गुंतवणूक अन् आज अडीच कोटी रुपयांची उलाढाल, धाराशिवमधील ITI होल्डरचा थक्क करणारा प्रवास, VIDEO

पांढऱ्या शुभ्र वस्त्रात महिला व पुरुष अनुयायी सहभागी झाले. समता सैनिक दल, महार रेजिमेंटचे माजी सैनिक आणि शाक्य संघाच्या सैनिकांनी मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, मिलिंद नगर मार्गे सम्राट चौक, डॉ. आंबेडकर उद्यान येथे लोकदर्शनासाठी हे अस्थिकलश रात्री 10 पर्यंत ठेवले होते. याप्रसंगी अनेक अनुयायांनी फुलांचा हार घेऊन अस्थि दर्शनासाठी हजेरी लावली. अस्थिचे कलशाचे दर्शन घेऊन अनुयायी नतमस्तक झाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलापूरकरांना मिळाले तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलशाचे प्रत्यक्ष दर्शन, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल