4 हजार रुपयांची गुंतवणूक अन् आज अडीच कोटी रुपयांची उलाढाल, धाराशिवमधील ITI होल्डरचा थक्क करणारा प्रवास, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
ग्रामीण भागातील तरुणाला शहरात व्यवसाय बसवण्यास बराच वेळ लागला. हळूहळू त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हळूहळू ग्राहक वाढत गेले. व्यवसायाची भरभराट होत गेली.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : मेहनतीने आणि कष्टाने संयम ठेवत सातत्यपूर्ण प्रयत्न केले, तर व्यक्तीला एक दिवस यश नक्कीच मिळते, हे एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. या व्यक्तीने 1998 मध्ये लाईट फिटींगचा व्यवसाय सुरू केला होता. आज वर्षाकाठी 2.5 कोटी रुपयांपर्यंत त्यांची उलाढाल पोहोचली आहे. जाणून घेऊयात, हा यशस्वी प्रवास.
रणजित साळुंखे यांची ही कहाणी आहे. ते धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी आहेत. रणजित साळुंखे यांनी औद्योगिक प्रशिक्षण घेतले आणि 1998 ला भूम येथे लाईट फिटींगचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर 2000 साली 4 हजार रुपयांची गुंतवणूक करून स्वतःचा इलेक्ट्रिक साहित्य विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. आता वर्षाकाठी त्यांच्या व्यवसायातून 2.5 कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.
advertisement
भूम तालुक्यातील चिंचोली येथील रणजीत साळुंखे यांनी भूम शहरात 1998 ला लाईट फिटिंग च्या कामाला सुरुवात केली. परंतु ग्रामीण भागातील तरुणाला शहरात व्यवसाय बसवण्यास बराच वेळ लागला. हळूहळू त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हळूहळू ग्राहक वाढत गेले. व्यवसायाची भरभराट होत गेली.
अनंत चतुर्दशी अन् ईद ए मिलादच्या मिरवणुका संपेपर्यंत जड वाहनांना मुंबईत नो एंट्री, वाहतूक प्रशासनाची नियमावली काय?
त्यानंतर त्यांनी भूम येथील एमआयडीसीत शेतीपंपासाठी लागणाऱ्या किटकॅट बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर इलेक्ट्रिक साहित्य विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय अधिक वाढवला. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. व्यवसायात नवीन असल्याने लोक काम देत नव्हते. हळुहळु लोकांचा विश्वास संपादन होत गेला आणि कामे मिळत गेली तशी व्यवसायात भरभराटी होत गेली.
advertisement
अनंत चतुर्दशी अन् ईद ए मिलादच्या मिरवणुका संपेपर्यंत जड वाहनांना मुंबईत नो एंट्री, वाहतूक प्रशासनाची नियमावली काय?
view commentsआता त्यांनी शेती पंपासाठी लागणारे किटकॅट बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. आयटीआयचे प्रशिक्षण घेतलेल्या रणजीत साळुंखे यांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तसेच आज वर्षाकाठी त्यांची उलाढाल कोट्यवधींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. त्यांचा हा प्रवास निश्चितच तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Sep 16, 2024 2:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
4 हजार रुपयांची गुंतवणूक अन् आज अडीच कोटी रुपयांची उलाढाल, धाराशिवमधील ITI होल्डरचा थक्क करणारा प्रवास, VIDEO







