सोलापूर : सोलापूर शहरातील विजापूर नाका परिसरात राज्य कर निरीक्षक या पदावर असलेले अधिकारी यांनी एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी अकॅडमी सुरू केली आहे. बुद्धजय अण्णासाहेब भालशंकर असे या राज्यकर निरीक्षकाचे नाव आहे. त्यांना हा क्लास कधी सुरू केला, त्यामागे नेमकी काय प्रेरणा आहे, इथे किती विद्यार्थी मोफत प्रशिक्षण घेत आहेत, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.
advertisement
बुद्धजय भालशंकर यांनी सोलापूरात मागील अडीच वर्षांपासुन सम्यक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मोफत सुरू केले आहे. बुद्धजय भालशंकर हे मुंबईतील शासकीय कार्यालयातील कामे आटपून सोलापूरात येऊन शनिवारी आणि रविवारी विद्यार्थांना मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन करतात. सम्यक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात 15 ते 20 विद्यार्थी आज मोफत प्रशिक्षण घेत आहेत.
या मार्गदर्शन केंद्राचा हेतू आहे की, समाजातील वंचित वर्गातील जो घटक आहे, ज्यांच्याकडे पैसे नाही, ज्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान भेटत नाही, अशा सर्व मुलांना याठिकाणी मोफत मार्गदर्शन करण्यात येते.
आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा फायदा आपल्या समाजातील बंधू-भगिनींना झाला पाहिजे, म्हणून हा उपक्रम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दर शनिवारी आणि रविवारी 15 ते 20 विद्यार्थी एकत्र येऊन आयोगाच्या प्रश्नपत्रिका, नेमका अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा पद्धती कशी असते, परीक्षेक कसे प्रश्न येतात, या सर्वांवर मार्गदर्शन करण्यात येते.
वारी 2024 : तुकोबांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, VIDEO
विद्यार्थ्यांना तशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केली जाते. नुकतेच सम्यक अकॅडमीच्या 12 विद्यार्थ्यांनी गट कची मुख्य परीक्षा दिली आहे. काही विद्यार्थ्यांची निवडही झाली आहे. नुकतीच प्राजक्ता कांबळे नावाच्या विद्यार्थिनीची सी.ए.टी च्या माध्यमातून 15 दिवसांपूर्वीच पुणे महानगरपालिकेमध्ये सह-शिक्षक पदी निवड झाली आहे.
वंचित वर्गातील जो घटक आहे, त्या वंचित वर्गाचा प्रशासनामध्ये टक्का कसा वाढेल, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही सम्यक अकॅडमी पे बॅक टू सोसायटी या विचारातून कार्य करत आहे. वंचित वर्गाला अधिकारी बनविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सुरू केलेली अभ्यासाची चळवळ आहे.





