TRENDING:

Sushilkumar Shinde : 'मी 83 वर्षांचा, आता माझं राजकारण..' सुशीलकुमार शिंदेंचं सोलापुरात मोठं विधान

Last Updated:

Sushilkumar Shinde : सोलापूर लोकसभा लढवण्यावरुन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर, 17 सप्टेंबर (प्रीतम पंडित, प्रतिनिधी) : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे या ना त्या कारणावरून सतत चर्चेत असतात. सोलापुरातील सुशील कुमार शिंदे विचार मंच आयोजित शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचा 50 रुपयात लग्नाचा किस्सा सांगितला. त्यामुळे कार्यक्रमात आलेल्या नागरिकांमध्ये एकच हास्यकल्लोळ पिकला. तर सोलापूर लोकसभा लढवण्यावरुनही शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.
सुशीलकुमार शिंदेंचं सोलापुरात मोठं विधान
सुशीलकुमार शिंदेंचं सोलापुरात मोठं विधान
advertisement

कसं झालं 50 रुपयांत लग्न?

1970 साली सुशीलकुमार शिंदे आणि उज्वला शिंदे यांचा विवाह 50 रुपयात झाला होता. अवघ्या पन्नास रुपयात त्यांनी रजिस्टर ऑफसला जावून लग्न केले होते. शिंदे यांच्या लग्नाला त्यांचे मोजके मित्र आणि बायको एवढेच हजर होते, असे सुशीलकुमार यांनी सांगितले. लग्नात जास्त खर्च झाला नाही पाहिजे याच विचाराचा मी आहे. लग्नात जो खर्च होतो. तो एखाद्या चांगल्या मेडिकल, शैक्षणिक कामासाठी वापरला पाहिजे. लग्नाच्या खर्चातून चांगली कामे झाली पाहिजेत. एक नवीन समाज तयार करण्यासाठी सगळ्यांची ताकद असणे गरजेचे आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित शिक्षकांना हा सामाजिक सल्ला दिला आहे. आता माझे राजकारण संपले आहे. मी 83 वर्षाचा झालो आहे. नवीन पिढीने आता पुढे आले पाहिजे, असे आवाहनही सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

advertisement

आमदार प्रणिती शिंदे लोकसभा लढवणार?

सुशीलकुमार शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे संकेत दिले आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीला सुशीलकुमार शिंदे यांनी पसंती दिली आहे. मला तर वाटतं प्रणिती कॉम्पिटेंट आहे. ती तिन्ही लँग्वेजमध्ये पावरफूल आहेत. अधिवेशनातही ती चांगली बोलते. त्याचा इफेक्ट देशावरही पडतो. प्रणिती शिंदे लोकसभेसाठी सक्षम आहेत. मात्र उमेदवारीचा निर्णय हायकमांड करतील. आम्ही तर सांगणार आहोत प्रणिती ताईंना उमेदवारी देऊन टाका, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या या विधानातून ते यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर प्रणिती शिंदे आता राष्ट्रीय राजकारणात दिसतील असे संकेतही मिळत आहेत.

advertisement

वाचा - आता गुलाबराव पाटील मैदानात; मंत्रिमंडळ बैठकीवरून विरोधकांना सुनावलं, म्हणाले..

इंडिया नाव बदलतील असं…

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

केंद्र सरकारने इंडिया ऐवजी भारत या शब्दाचा वापर सुरू केला आहे. त्यावरून सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपवर हल्ला चढवला. इंडिया नावाबाबत या अधिवेशनात काही करतील असे वाटत नाही. इंडिया नाव बदलण्याबाबत भरपूर कॉम्प्लीकेशन आहेत. देशाचे नाव इंडिया आहे, तेच राहिले पाहिजे. विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीमुळे केंद्रातील भाजप सरकार घाबरले आहे. म्हणूनच त्यांच्याकडून इंडिया या शब्दाचा वापर टाळला जात आहे, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Sushilkumar Shinde : 'मी 83 वर्षांचा, आता माझं राजकारण..' सुशीलकुमार शिंदेंचं सोलापुरात मोठं विधान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल