आता गुलाबराव पाटील मैदानात; मंत्रिमंडळ बैठकीवरून विरोधकांना सुनावलं, म्हणाले..

Last Updated:

मराठवाड्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. या टीकेला आता गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

News18
News18
जळगाव, 17 सप्टेंबर, नितीन नांदूरकर : शनिवारी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार पलटवार केला आहे. आठ वर्षांत विरोधकांची काही बोंब पडली नाही, त्यांनी इतकी वर्ष का बैठक घेतली नाही असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? 
शनिवारी मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आठ वर्षांत विरोधकांची काही बोब पडली नाही, इतकी वर्ष बैठक का घेतली नाही असा सवाल त्यांनी उपस्थि केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, काही नसलं की विरोध करायचा एवढा एकमेव उपक्रम विरोधकांकडून सुरू आहे. मात्र आम्ही त्यांना कामातून उत्तर देतो असं पाटील यांनी यावेळी म्हटलं.
advertisement
दरम्यान त्यांनी यावेळी बोलतान शासन दिव्यांगांसाठी राबवत असलेल्या उपक्रमावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. दिव्यांगांना सर्व सुख सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यातल्या शासनाचा जो उपक्रम आहे हा खूप चांगला उपक्रम आहे. आगामी काळात दिव्यांगांना 500 सायकलींचे वाटप केले जाणार आहे, त्या माध्यमातून त्यांनी केवळ गावात न फिरता त्या सायकलवरून त्यांना काही व्यवसाय देखील सुरू करता येईल, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
आता गुलाबराव पाटील मैदानात; मंत्रिमंडळ बैठकीवरून विरोधकांना सुनावलं, म्हणाले..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement