सोलापूर : पंढरपूर राज्याची अध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखली जाते. येथे येणारा भाविक भक्त मोठ्या आस्थेने तुळशीची माळ खरेदी करतो. तुळशीची माळ एखाद्या भाविकाने गळ्यात घातल्यास त्याला काही तत्वे पाळावी लागतात. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत पंढरपुरात चायना माळांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे पंढरपुरातील तुळशी माळा बनवणाऱ्या करागिरांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
advertisement
आषाढी वारी जवळ येत असल्याने तुळशी माळा बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. पण चायना माळामुळे चायना तुळशीची माळमुळे पारंपरिक तुळशी माळा बनवणाऱ्या करागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चायना माळमुळे पारंपरिक तुळशी माळा बनविणाऱ्या करिगारांची संख्याही कमी होत चालली आहे. 300 ते 400 करागिरावरून आता 50 कारागीर काम करत असल्याची खंत पारंपरिक तुळशी माळा व्यवसायिक सागर उपळकर यांनी व्यक्त केली.
वारी 2024 : तुकोबांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, VIDEO
वारीत आणि वारकऱ्यांसाठी तुळशीमाळेचं विशेष महत्व आहे. विठुरायाला तुळस प्रिय आहेच. त्याचबरोबर तुळशीमाळ घालण्याची अनेक शास्त्रीय कारणे व फायदे आहेत. वारकऱ्यांच्या गळ्यात विठोबाचे नाम घेत रुळणारी ही 108 मण्यांची माळ भक्तीचे प्रतीक मानली जाते. वर्षांनुवर्षे पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या या तुळशीमाळेसमोर आता चायना मेड तुळशी माळेचे आव्हान उभे ठाकले आहे.
वारीच्या वाटेत रमला अन् सोडली दारू, पांडरंगाच्या भक्तीत लीन झालेल्या व्यक्तीची प्रेरणादायी गोष्ट!
तुळस म्हणजे सात्विकता, मांगल्यता, आणि पवित्रता असते. तुळशीमुळे घरातील वातावरण शुद्ध राहते. ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, कुटुंबातील माणसाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तुळशीची माळ धारण केल्याने पापे नष्ट होतात, अशी भागवत धर्मात धारणा आहे.