TRENDING:

Gondia: 'बाप का बदला लेगा तेरा सुनील' वडिलांचा मर्डर करणाऱ्या देवेंद्रचे तुकडे केले लेकाने! सिनेमाला लाजवेल अशी घटना

Last Updated:

वडिलांचा खून करणाऱ्या मारेकऱ्याची एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या मारेकऱ्याचा मुलाने खून केला आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी सपाटे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

गोंदिया : 'बाप का, भाई का बदला लेगा रे तेरा फैजल' गँग ऑफ वासेपूर नावाच्या सिनेमातला डायलॉग चांगलाच गाजला होता. आता या सिनेमासारखीच एक घटना गोंदियामध्ये घडली आहे. वडिलांचा खून करणाऱ्या मारेकऱ्याची एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या मारेकऱ्याचा मुलाने खून केला आहे. तलवारीने सपासप वार करून वडिलांच्या हत्येचा बदला घेतला.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी इथं ही घटना घडली आहे.  जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची तलवारीने निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. भुरु उर्फ देवेंद्र ताराम (25) असं हत्या करण्यात आलेले तरुणाचं नाव आहे. तर सुनील कांबळे असं आरोपीचं नाव आहे.

वडिलांची का केली होती हत्या

9 महिन्यांपूर्वी मृतक देवेंद्र उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम याने आरोपी सुनील कांबळे याचे वडील आसाराम कांबळे (वय ६०) याची जादूटोणाच्या संशयातून हत्या केली होती.  मृतक आसाराम कांबळे हे गावाजवळील जंगल शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेले असता सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत घरी परतले नाही. तर शेळ्या मात्र घरी आल्याने आसारामच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांसह जंगलाकडे धाव घेतली. यावेळी त्यांना आसाराम यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना जंगल शिवारातील असल्याने आणि आसारामच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आल्याने प्रथमदर्शनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात त्याच्या मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करत गावकऱ्यांनी घटनेची माहिती गोरेगाव वन विभागाला दिली. दरम्यान, वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार घातपाताच्या असल्याचं दिसून आलं. यावर त्यांनी गोरेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ घाटून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला.

advertisement

गावातून मावशीच्या घरातून देवेंद्रला अटक

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं गावात तपास केला असता मृत आसाराम कांबळे याची हत्या भुरु ताराम याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली. या आधारे आरोपी देवेंद्र उर्फ भुरू ताराम याचा शोध घेण्यासाठी हेटी (पालेवाडा), मुंडीपार, भंड़गा, हलबीटोला (गोरेगाव) इथं शोध पथके रवाना करण्यात आली असता, रात्री ११.३० वाजताच्या सुमारास आरोपी देवेंद्र उर्फ भुरू ताराम हा हलबीटोला (गोरेगाव) येथील आपल्या मावशीच्या घरी लपून बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. तेव्हा त्याने आसाराम कांबळे यास डोक्याच्या मागे लोखंडी कुऱ्हाडीने मारून खून केल्याचे कबुली दिली.  देवेंद्रला न्यायालयात हजर करून जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती.

advertisement

जामिनावर सुटका आणि खुनाचा बदला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
reel star ची शूटसाठी आवडती जागा, मुंबईत इथं येईल गोव्यासारखा फील, तुम्ही दिलीये कधी भेट?
सर्व पहा

8 दिवसांपूर्वी देवेंद्र हा जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर देवेंद्र हा आपल्या गावी परतला होता. मृतक देवेंद्र गावात परत आल्याचं कळताच आसाराम कांबळे यांचाा मुलगा आरोपी सुनील कांबळे  याने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचा चंग बांधला. काही दिवस त्याने देवेंद्रवर पाळत ठेवली. त्यानंतर  संधी साधून मृतक दिनेशला गावातच पकडलं आणि तलवारीने सपासप वार केले. मान, हात, पाय आणि पोटाला झालेल्या गंभीर जखमांमुळे दिनेशचा जागीच मृत्यू झाला. देवेंद्रची हत्या केल्यानंतर सुनील कुठे पळून गेला होता. हत्येनंतर आरोपी सुनील कांबळे याने पोलीस पाटलांसमोर समर्पण केलं. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे..

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gondia: 'बाप का बदला लेगा तेरा सुनील' वडिलांचा मर्डर करणाऱ्या देवेंद्रचे तुकडे केले लेकाने! सिनेमाला लाजवेल अशी घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल