TRENDING:

Satara News: कोकणच्या चाकरमान्यांसाठी ST सज्ज; साताऱ्यातून सुटणार 200 जादा बसगाड्या, वाचा सविस्तर

Last Updated:

Satara News: यावर्षी कोकणात खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड, देवरुख आणि रत्नागिरी या भागात बसेस जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचीही गैरसोय दूर होणार आहे आणि तसेच...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील 11 आगारांमधून लांब पल्ल्याच्या आणि जिल्हांतर्गत एकूण 200 पेक्षाही जास्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकणमधील चाकरमान्यांचा विचार करता जादा बसफेऱ्या उपलब्ध होणार आहेत. गणेशोत्सवामुळे बसस्थानकांवर चाकरमान्यांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Satara News
Satara News
advertisement

कोकणात पाठवण्यात येणार ज्यादा गाड्या

यावर्षी कोकणात खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड, देवरुख आणि रत्नागिरी या भागात बसेस जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचीही गैरसोय दूर होणार आहे आणि तसेच विभागाला मोठ्या फायदा होणार आहे. तसेच या काळात मार्गतपासणी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा विभागातून मुंबई-ठाण्यासाठी जिल्ह्यातील विविध आगारांमधून 260 बस पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक 2 बसमधून एक कंडक्टर पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

advertisement

प्रवाशांची संख्या विचारात घेऊन निर्णय

गणेशोत्सव असल्यामुळे कोकणातील चाकरमान्यांची गाडी जाण्यासाठी बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे एसटी विभागाकडून गणेशोत्सवातील मुख्य कालावधी आणि परतीचा प्रवास याचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे आणि कोकणातील प्रवाशांची संख्या विचारात घेऊन बसेस पाठवण्यात येणार आहेत.

हे ही वाचा : Ganpati Aarti : बाप्पाची आरती म्हणताना तुम्ही करताय 'या' चुका, 99% लोकांना माहितीच नाही

advertisement

हे ही वाचा : Yavatmal News: ग्रामपंचायत फोडली, कागदपत्रं जाळली; ग्रामसभेपूर्वीच 'या' गावात उघडकीस आला कांड!

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara News: कोकणच्या चाकरमान्यांसाठी ST सज्ज; साताऱ्यातून सुटणार 200 जादा बसगाड्या, वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल