Ganpati Aarti : बाप्पाची आरती म्हणताना तुम्ही करताय 'या' चुका, 99% लोकांना माहितीच नाही

Last Updated:

Ganesh Aarti Mistake : गणपती बाप्पा आल्यावर त्यांची पूजा करताना अनेक आरत्या म्हटल्या जातात. मात्र या आरत्या म्हणताना अनेक चुकाही होतात. बाप्पा मोठा मनाचा, त्यामुळे तो आपल्या सगळ्या चुका पोटात घालतो, पण आपण त्या चुका टाळायला हव्यात.

News18
News18
नवी दिल्ली : गणेशोत्सवात आरतीचा उत्साह काही वेगळाच असतो. काही लोक प्रथेप्रमाणे दिवसातून दोन वेळा किंवा तीन वेळा आरती करतात. या आरतीसाठी आपण आरती संग्रह, टाळ, ढोलकी अशी सर्व व्यवस्था करतो. काहींना आरती पाठ असते, तर काही जण पुस्तक घेऊन आरती म्हणतात. पण तरी बहुतेक जण आरती म्हणताना चुका करतात. पण काही हरकत नाही. या गणेशोत्सवात आणि त्यानंतर या चुका होऊ नयेत, यासाठी हा लेख.
गणपती बाप्पा आल्यावर त्यांची पूजा करताना अनेक आरत्या म्हटल्या जातात. 'सुखकर्ता दुःखहर्ता', 'शेंदुर लाल चढ़ायो', 'दुर्गे दुर्घट भारी', 'येई हो विठ्ठले', 'घालीन लोटांगण' अशा अनेक आरत्या यावेळी म्हटल्या जातात. मात्र या आरत्या म्हणताना अनेक चुकाही होतात. बाप्पा मोठा मनाचा, त्यामुळे तो आपल्या सगळ्या चुका पोटात घालतो, पण म्हणून आपण त्या चुका करत राहायला हव्या असं नाही.
advertisement
आरतीमधील काही सामान्य चुका कोणत्या आणि त्याचे योग्य उच्चार कोणते याबद्दल जाणून घेऊया.
आरतीत म्हणताना होणाऱ्या चुकायोग्य शब्द किंवा उच्चार
नुरवी पुरवी प्रेम कृपा देवाची!कृपा जयाची
रत्नखचित करारत्नखचित फरा
संकष्टी पावावेसंकटी पावावे
ओटी शेंदुराचीउटी शेंदुराची
वक्रतुंड त्रिनेमावक्रतुंडत्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सजणादास रामाचा वाट पाहे सदना
फळीवर वंदनाफणिवरबंधना
ओवाळू आरत्या कुरवंट्या येतीकुरवंडया येती
कायेन वाचा मच्छिन्द्र देवामनसेंद्रियैर्वा
दीपक जोशी नमोस्तुतेदीपज्योती नमोस्तुते
क्लेशापासून तोडी तोडी भवपाशाक्लेशांपासूनि सोडवि तोडी भवपाशा
सेतू भक्तालागीते तू भक्तालागी, पावसी लवलाही
व्याघ्रांबर फणिवरदरव्याघ्रांबर फणिवरधर
लवलवती विक्राळालवथवती विक्राळा
advertisement
आरतीमध्ये सर्रास होणाऱ्या या काही चुका आहेत. तुमच्याकडूनही आरती म्हणताना या चुका होत असतील तर तुम्हाला हे योग्य उच्चार नक्कीच मदत करतील. आजच या चुका सुधारा, तसंच इतरांच्याहीा लक्षात आणून द्या.
गणपतीची आरती कोणत्या वेळी करावी? 
पुजारी येलकर महाराज यांनी लोकल18ला दिलेल्या माहितीनुसार, आरतीची वेळ ही सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 8 वाजेपर्यंत असावी. यावेळेत आरती करणं शक्य न झाल्यास दुपारी 12 वाजण्याच्या आत आरती करून घ्यावी. संध्याकाळी सूर्यास्तानंतर 6.30 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान गणपतीची आरती करावी. पूजेसाठी शारीरिक आणि मानसिक शुद्धी महत्वाची आहे. त्यामुळे प्रसन्न आणि फ्रेश झाल्यानंतरच आरती करायला घ्यावी.
advertisement
गणपती बाप्पा मोरया!
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganpati Aarti : बाप्पाची आरती म्हणताना तुम्ही करताय 'या' चुका, 99% लोकांना माहितीच नाही
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement