पीडितांना न्याय आणि आर्थिक भरपाई मिळावी यासाठी कर्मचारी आणि विविध संघटना गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत असताना भाजप आमदार विक्रांत पाटील गेल्या काही काळापासून नगरविकास विभागापासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत फेऱ्या मारत आहेत. अखेर आमदार विक्रांत पाटील यांना माजी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश मिळाले आहे.
बीएमटीसीच्या तब्बल ४१ वर्षांनंतर ६३१ कर्मचाऱ्यांना लवकरच प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत मिळेल. कामगारांच्या लढ्याबाबत आमदार विक्रांत पाटील म्हणाले की, बीएमटीसीमध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होतो. सिडको आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि विशेष बैठकींद्वारे यावर चर्चा देखील केली. ज्या कर्मचाऱ्यांना आधीच पीएफ आणि ग्रॅच्युइटी मिळाली आहे त्यांना प्रथम सिडकोमार्फत १० लाख रुपयांचे धनादेश दिले जातील, त्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांनाही भरपाई देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.
advertisement