सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी गेल्या होत्या. अजितदादांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, ' उद्या रविवारी देशाचं आर्थिक बजेट सेशन आहे. त्यामुळे दिल्लीला जाणार आहे, त्यासाठी आशा काकींची परवानगी घ्यायला गेले होते. मी सभागृहाची गटनेते असल्याने दिल्लीला जावं लागणार आहे, असं सांगितलं " अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.
advertisement
दरम्यान, आज शपथविधी होत असताना पवार साहेबांना विश्वासात घेतले नाही यावर विचारले असता त्यांनी हात जोडून रामकृष्ण हरी असे म्हणत बोलणे टाळलं. आशा काकींच्या तब्येतीबाबत विचारले असता त्या निरुत्तर झाल्या.
रोहित पवार विदीप जाधव यांच्या घरी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या तरडगाव येथील निवासस्थानी रोहित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट दिली, बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामध्ये त्यांच्यासोबत असणारे पीएसओ विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. त्यांचे मुळगाव फलटण जवळचे तरडगाव असून आज त्यांच्या निवासस्थानी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी घरातील नातेवाईकांची सांत्वन पर भेट घेतली. यावेळी अजित दादांसोबतच्या अनेक गोष्टींना घरातील नातेवाईकांनी उजाळा दिला.
