तळेगांव दाभाडे नगरपरिषद इमारतेचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला अजित पवार यांची प्रमुख उपस्थित असणार होती. पण त्यांनी ऐनवेळी दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव नगर परिषदेला असल्याने आणि त्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याने वेगळा राजकीय संदेश जाण्याची शक्यता होती. या कारणामुळे अजित पवार यांनी दांडी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
advertisement
पुन्हा हेडगेवार यांचे नाव देणार नाही, पण आत्ता पुसणारही नाही
तळेगांव नगरपरिषदेचे नाव केशव बळीराम हेडगेवार आहे. मी आमदार राष्ट्रवादीचा आहे. तरीही मी हेडगेवार यांचे नाव नगर परिषदेच्या भवनाला दिले. कारण अजित पवार यांनी मला कधीही कोणाचे नाव काढण्याची शिकवण दिलेली नाही, असे सांगताना मी पुन्हा हेडगेवार यांचे नाव लावणार नाही, असे सुनील शेळके म्हणाले.
माझी जडणघडण भाजपमध्ये झाली हे जनतेने लक्षात घ्यावे
मावळच्या मायबाप जनतेला केवळ एवढेच सांगायचे आहे की हा सुनील शेळके भारतीय जनता पक्षामध्ये घडला, लहानाचा मोठा झाला. आज या मावळ तालुक्यात विकासकामे करतोय. अजित पवार यांनी मला मोठा निधी दिला. त्यांनी कधीही कुणाचे नाव पुसण्याची शिकवण दिली नाही, असे शेळके म्हणाले. यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शेळके यांच्या भूमिकेला टाळ्यांनी प्रतिसाद दिला.
मामा भाच्यांच्या भानगडीत तुम्ही पडू नका, बाळा भेगडे यांना टोला
उद्याच्या काळामध्ये या तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असताना चांगले काम करणे माझी देखील जबाबदारी आहे. मागच्या काळामध्ये विकासकामांना जो निधी आला, या निधीतून आपण मोठमोठी कामे करण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्ह्यातला सर्वात सुजलाम तालुका म्हणून आम्हाला मावळ तालुका पाहायला मिळेल, असे ते म्हणाले. त्याचवेळी मामा भाच्यांच्या भानगडीत तुम्ही पडू नका, असा टोला त्यांनी विरोधक बाळा भेगडे यांना उद्देशून लगावला.