सुप्रिया सुळे या प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. या देशामध्ये संविधान हातात घेऊन भाषण करणे गुन्हा असेल तर आम्हाला तो गुन्हा मान्य असेल तर देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला अटक करावी.पण आम्ही संविधान हातातून सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत संविधान हातातून सोडणार नाही. देवेंद्र संविधानाचा द्वेश करत असतील, त्यांना ते चुकीचे वाटत असेल तरी आम्ही हातातून सोडणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
advertisement
सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या त्या व्हिडिओवर देखील भाष्य केले आहे. हे खूपच धक्कादायक आहे. मी देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाचा जाहीर निषेध करते. हा शाहु,फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रात एक गृहमंत्री बदलापूर म्हणूम बंदूकी घेऊन फोटो त्यांचा व्हायरल होतो. ठीक आहे त्यांनी हे पोस्टर लावलं नाही.पण तो काढायला सांगणं त्यांचे कर्तव्य होतं,असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर केला.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, आधी तुम्ही अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता नंतर आरोपांची फाईल त्यांनाच दाखवता. ईडी सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती दाखवता. तसेच दोन पक्ष फोडून मी सत्तेत आलात अशी विधान करता, असा हल्ला देखील सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर चढवला.
