एवढेच नाही तर महायुतीमध्ये निवडणूक लढत असेल तर तुतारीला पण सोबत घ्या, अशा सूचना फोन करून अजित पवार यांनी दिल्या होत्या, असेही सुरेश बिराजदार यांनी सांगितले. विलिनीकरणाच्या चर्चा जरी आता जोरात सुरू असल्या तरी अजित पवार यांच्या हयातीत यासंबंधीचे पावले उचलली गेली होती, असेही त्यांनी सांगितले.
अजितदादांनी फोन करून सांगितलं, दोन्ही पक्ष एकत्र लढा
advertisement
जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आघाडी करून निवडणुकीला सामोरे जा, अशा सूचना अजित पवार यांनी अपघाताच्या दोन दिवसापूर्वी फोन करून दिल्या होत्या, अशी आठवण अजित पवार यांचे नातेवाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सांगितली. शरद पवार साहेब आणि अजित दादांसोबत आमचे दोन पिढ्यांचे संबंध होते. दोन्ही पक्ष एकत्र यावेत, अशी भावना बिराजदार यांनी व्यक्त केली. ही आठवण सांगताना बिराजदार यांना अश्रू अनावर झाले.
जिल्हा परिषद निवडणुकीत बँडबाजा, हलगी लावणार नाही, मिरवणुका काढणार नाही
आमचे कुटुंब गेल्या ४० वर्षापासून पवार कुटुंबाशी एकनिष्ठ असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भावना असल्याचेही सुरेश बिराजदार म्हणाले.जिल्हा परिषद निवडणुकीत पक्ष म्हणून निवडणूक लढविताना आम्ही कुठेही बँडबाजा, हलगी, मिरवणुका, रॅली सभा घेणार नाही. कार्यकर्त्यांनी तशी काळजी घ्यावी, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले असल्याचे बिराजदार म्हणाले.
