बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांनी हा धक्कादायक आरोप केले. सुरेश धस यांनी म्हटले की, वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आली असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.
सुरेश धस यांनी म्हटले की, नातेवाईकांच्या सुनेकडून तुम्ही पैसे मागता...म्हणजे तुम्ही फॉल्टी आहात.. त्यांच्यात नैतिकता नाही...आता 150 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचे काय करायचे? बाहेर आले तर यांना लोक शेण हाणणार आहे.. काही लोकांनी टमाटे हाणले मात्र त्याने काही होणार नाही..हे बाहेर आल्यावर यांना कवट मारले पाहिजे असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले.
advertisement
धस यांनी म्हटले की, भविष्यात आष्टी मतदार संघाने हगवणे कुटुंब जामिनावर सुटले तर त्यांच्यासाठी एक गाडी आणि कवट तयार ठेवा, असे चिथावणी देणारे वक्तव्य केले.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी आरोपांचा धुरळा उडवला होता. या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली. आता सुरेश धसांच्या रडारवर जालिंदर सुपेकर आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
