बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याचं सांगण्यात येत होतं. यावरुन विरोधकांनी रान उठवत धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडलं होतं.आता या राजीनाम्यावरुन सुरेश धस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
advertisement
काय म्हणाले सुरेश धस?
नागपूरच्या पहिल्याच आधिवेशात मी संतोष देशमुख यांचा मुद्दा मांडला आणि त्याप्रकरणी न्यायच मिळवून घेतला. यात एका मोठ्या नेत्याची विकेटही त्यात पडली. ते पण क्लीन बोल्ड होण्याची पाळी त्यांच्यावर आली. कारण त्यांचे सहकाऱ्यांनी हा उद्योग केला होता, असे सुरेश धस म्हणाले. यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव न घेतले नाही. पण त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर टीका केली.
आम्ही जनतेचे सालकरी : सुरेश धस
एक लाख 41 हजार मतदारांनी मला मतदान दिलं, ही माझ्यासाठी पहिलीच वेळ आहे. माझा कोणताही कारखाना नाही, संस्था नाही किंवा मी कोणताही सम्राट नाही. पण, जनतेच्या मनावर प्रेम करणारा मी नक्कीच सम्राट आहे. काही लोक निवडून आल्यावर स्वतःला मालक समजतात आणि डरकाळी फोडतात. पण, आम्ही जनतेचे सालकरी आहोत आणि आम्ही तसेच राहिलो पाहिजे. छाताड फुगवणारे आणि लॉकेट घालणारे विधानभवनात जास्त काळ टिकत नाहीत, असेही सुरेश धस यांनी म्हटले.
चिखलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांनी नाव न घेता चांगलीच टोलेबाजी केली. संतोष देशमुख यांच्या अत्यंत क्रूर आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या हत्येनंतर बीड जिल्ह्याचं सामाजिक, राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललं. जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजली. देशमुख प्रकरणी आमदार धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावरुन धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात कमालीचा संघर्ष निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा धस यांनी हे वक्तव्य करत वादाला तोंड फोडलं आहे.
हे ही वाचा :
बीड अपहरण प्रकरणात मोठं अपडेट, 24 तासांत तपासाची चक्रे फिरली, 10 जण ताब्यात