TRENDING:

गुंजाळ महाराज प्रकरणात सस्पेन्स वाढला, का होतेय नार्को टेस्टची डिमांड? गाव बंद करत मोठी मागणी

Last Updated:

गावातील व्यवहार ठप्प ठेवून नागरिकांनी या घटनेचा निषेध केला आणि पीडित मुलीला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील दवळपुरी ढवळपुरी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी गावकऱ्यांचा संताप तीव्र स्वरूपात व्यक्त झाला. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज याला आरोपीविरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी संबंधित महाराजांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
News18
News18
advertisement

या निषेधाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण ढवळपुरी गाव बंद ठेवले. गावातील व्यवहार ठप्प ठेवून नागरिकांनी या घटनेचा निषेध केला आणि पीडित मुलीला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी केली. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली असली तरी त्याला कोणतीही सवलत देऊ नये, जामीन नाकारावा आणि कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

गावचे सरपंच काय म्हणाले?

वारकरी सांप्रादायाला काळीमा फासण्याचे काम केले आहे. कुटुंबाच्या पाठीमागे संपूर्ण गाव एकवटले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी गावचे सरपंच भागाजी गावडे यांनी केली आहे. तर हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालला पाहिजे तसेच त्यानंतर त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्याच्यापुढे जाऊन त्याचा सायबर सेलतर्फे त्याच्या मोबाईलचा पूर्ण तपास करावा, असे माजी सरपंच राजेश भंडारी म्हणाले.

advertisement

कठोर पावले उचलण्याची मागणी

या संपूर्ण प्रकारामुळे ढवळपुरीत वातावरण तापले असून प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. ग्रामस्थांनी तातडीने ठोस कारवाई करून महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
100 वर्षांपासून जपलाय परंपरेचा वारसा, पुण्यात टोपी खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाण, असते मोठी गर्दी
सर्व पहा

ढवळपुरी गावातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर कीर्तनकार यशवंत थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यांनी धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. नववीत शिक्षण घेत असताना आरोपीने जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले आणि हा प्रकार कुणाला सांगितल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. भीतीपोटी पीडित मुलीने अनेक वर्षे मौन बाळगले. मात्र 10 मार्च रोजी आरोपीने फोन करून घरी बोलावले असता तिने नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपीने तिला मारहाण केली. तसेच स्वयंपाकघरातील लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून तिच्या दोन्ही मांडींवर चटके दिल्याचा अमानुष प्रकार उघड झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गुंजाळ महाराज प्रकरणात सस्पेन्स वाढला, का होतेय नार्को टेस्टची डिमांड? गाव बंद करत मोठी मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल