सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे. साधना धोंडीराम भोसले (वय 17) असं मृत मुलीचं नाव आहे. याप्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले त्याचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली आहे. मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिच्या आईला आपल्या पतीविरोधात पोलिसात फिर्याद देण्याचे वेळ आली.
advertisement
वडील शिक्षक तर आई होती गावची पोलीस पाटील
महाविद्यालयाच्या बारावीच्या नीटच्या बोर्ड पॅटर्ननुसार, होणाऱ्या परीक्षांमध्ये 30 पैकी 19 तर ग्रुप मार्क्समध्ये ३ विषयाला 720 पैकी 173 मार्क मिळाले होते. धोंडीराम भगवान भोसले राहणार नेलकंरजी इथं माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांचे वडील भगवान भोसले त्याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि माजी पोलीस पाटील होते. पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच होत्या. तर धोंडीराम यांना मुलगा आणि साधना मुलगी अशी दोन मुले आहेत.
'पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते. तुम्ही कुठे कलेक्टर झालात?
साधना आटपाडीत बारावीचे महाविद्यालयात शिक्षण घेत होती. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती. तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती. त्यात तिला कमी गूण मिळाले. त्यामुळे वडील धोंडीराम चिडले. शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का? मिळाले याचा जाब विचारत मारहाण केली. यादरम्यान साधनानेही त्यांना उलट सुलट उत्तरं द्यायला सुरुवात केली. 'पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते. तुम्ही कुठे कलेक्टर झालात? शिक्षकच झालात' असं साधनाने म्हटलं. मुलीनं दिलेलं उलट उत्तर ऐकून शिक्षक असलेल्या धोंडीराम यांचा संताप अनावर झाला. घरातच असलेल्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. साधनाच्या डोक्याला जबर मार लागला संपूर्ण शरीराला इजा झाली. तिला सांगली येथील उषःकाल रुग्णालयात नेले असता उपचार पूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे.
पत्नी प्रीती आणि मुलांच्या सांगण्यावरून आरोपी विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे, आरोपीला पोलीस कोठडी मिळाली आहे अधिकचा तपास सुरू असल्याचं आटपाडी पोलिसांनी सांगितलं.
