परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. एकूण ६५ जागांसाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने महाविकास आघाडीचा धर्म पाळला. इथं ठाकरे गट आणि काँग्रेसने आघाडी केली होती. दोन्ही गटाने एकत्र निवडणूक लढवली. ठाकरे गटाला इथं सर्वाधिक १८ जागा जिंकल्या आहे. तर काँग्रेसने १२ जागा जिंकल्या आहेत. ठाकरे गट आणि काँग्रेसने ३० जागांवर विजय मिळवला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त २ जागांची गरज आहे.
advertisement
परभणी महापालिका निवडणूक निकाल
भाजप - 12
शिवसेना शिंदे - 0
राष्ट्रवादी ( AP ) - 10
शिवसेना ( UBT ) - 18
काँग्रेस - 12
अपक्ष - 4
ठाकरे गटाच्या विजयाचं गणित काय?
विशेष म्हणजे, परभणीमध्ये खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने आक्रमक असा प्रकार केला होता. दोन्ही नेत्यांच्या प्रचारामुळे महाविकास आघाडीला इथं विजय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला. परभणी हा तसा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जात होता. पण मागील काही वर्षांपासून काँग्रेसने इथं आपली पकड मजबूत केली. त्यामुळे काँग्रेस-ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट-भाजप अशी लढत होती. पण महायुतीमध्ये इथं बिघाडी झाली होती. भाजप आणि शिवसेनेनं अनेक जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्याचा फटका हा मतविभाजनात झाला.
तर अजित पवार गटाने सुद्धा परभणीमध्ये शरद पवार गटासोबत आघाडी केली होती. पण, या आघाडीला परभणीकरांनी नाकारलं, इथं पवार गटाला भोपळाही फोडता आला नाही.
तर दुसरीकडे, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने सुद्धा अनेक ठिकाणी मुस्लिम बहुल भाग आणि दलित भागात आपले उमेदवार उभे केले होते. पण, याचा परिणाम मोठ्या विजयात झाला नाही.
मागील पालिका निकालात काय झालं?
परभणी पालिका निवडणूक २०१७ मध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसने तेव्हा ३१ जागा जिंकल्याा होत्या. रााष्ट्रवादी काँग्रेसने १८ आणि भाजपने ८ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेनं ६ जागा जिंकल्या होत्या. पण, यावेळी निकाल हा पूर्णपणे फिरला आहे. ठाकरे गटाने इथं सर्वाधिक १८ जागा जिंकून मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिलं आहे.
