विद्यार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज?
मेट्रो प्रकल्प राबवणाऱ्या एमएमआरडीएने (MMRDA) ट्रायल रनसाठी आवश्यक त्या तयारीला अंतिम स्वरूप दिले. त्यानंतर अखेर शारदीय नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर ट्रायल रन पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ही ट्रायल रन पार पडणार आहे. या ट्रायल रननंतर मेट्रो केव्हापासून नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होणार याची माहिती कळेल. ठाणेकरांसाठी कायमच ट्राफिकचा हा कळीचा मुद्दा ठरला आहे. केव्हाही प्रवास करा प्रवाशांना वाहतूक कोंडी ही मिळतच असते. अखेर यावर्षी तरी ठाणेकरांचा वाहतूकीच्या त्रासातून सुटका होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
दिवाळीत लालपरीच्या प्रवाशांना दिलासा! 'या' मार्गांवर छ. संभाजीनगरमधून धावणार अतिरिक्त बस
ठाणे शहराचा गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. शहरामध्ये असलेले मोठमोठे कार्यालये, मुंबई शहराला जोडणारे महत्वाचे शहर, शहरातील वाढती लोकसंख्या अशा अनेक मुद्द्यांमुळे वाहतूक कोंडी ही ठाणेकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलीय. ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी शहरामध्ये मेट्रो रेल्वेचं काम सुरु करण्यात आलंय. दिलेल्या डेडलाईनप्रमाणे आता लवकरच ट्रायल रन पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ठाणे मेट्रो 4 आणि ठाणे मेट्रो 4 अ ची ट्रायल रन पार पडणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मेट्रोचे डबे या मार्गावर क्रेनच्या मदतीने ठेवण्यात आले.
रूळामध्ये बिघाड, आपात्कालीन परिस्थितीत आपोआप ब्रेक... रेल्वे प्रवास सुखकर होणार
ठाण्यातील मेट्रो मार्गिका 4 आणि 4 अ मधील 10 स्टेशन दरम्यान ट्रायल रन केली जाणार आहे. मेट्रो लाईन 4 आणि 4 अ या मेट्रो रेल्वे स्टेशनचं काम युद्ध पातळीवर करण्यात आलं. यामधील 10.5 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात ट्रायल रन घेण्यात येणार आहे. ठाणे मेट्रोच्या 10 स्टेशनची नावेही निश्चित करण्यात आली आहेत. या स्टेशनवर ही ट्रायल रन होणार आहे. कॅडबरी, माजीवाडा, कपूरबावाडी, मानपाडा, टिकूजी -नी -वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डनर, कासरवाडावली, गोवानिवाडा आणि गायमुख अशा 10 स्थानकांचा समावेश आहे.