ज्या प्रारूप याद्या जाहीर केल्या आहेत, त्यामध्ये प्रचंड गोंधळ आहे. जवळजवळ प्रत्येक प्रभागांमध्ये बाहेरची नावे घुसविण्यात आलेली आहेत. प्रभाग क्रमांक तीनमध्ये पाचमधली नावे आलेली आहेत, पाचव्या प्रभागातली नाव तिकडे आलेली आहेत. अशा प्रकारे जर मतदार याद्या असतील तर निवडणुका निष्पक्ष कशा होतील? असा सवाल अविनाश जाधव यांनी विचारला.
बोगस नावे कुणी घुसवली?
advertisement
अनेक लोक ज्यांनी विधानसभेला मतदान केले पण त्यांची नावे आता महापालिकेला नाही. अनेक नावे अशी आहेत ज्यांची अचानकपणे वॉर्डात एन्ट्री झाली आहे. आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना काही उदाहरणे दाखवून दिली. पण त्यांच्याकडे काहीच उत्तरे नव्हती. ठाण्यात १६ लाख ४९ हजार मतदार होते, आता साडेचार लाख मतदान वाढलेले आहेत, यांची नावे कुणी घुसवली असा प्रश्न अविनाश जाधव यांनी विचारला. तसेच मतदार याद्या जोपर्यंत साफ होत नाहीत तोवर निवडणुका होऊ नयेत असे आमचे म्हणणे असल्याचे जाधव म्हणाले.
काम करणारे हरतात, घरात बसणारे जिंकतात, ही कुठली पद्धत
जिंकून यायला आम्हाला आठ नऊ हजार मतदान लागते. परंतु काही लोक बाहेरचे बोगस मतदान घुसवतात आणि जिंकून येतात. अनेक वर्षांपासून जातीने काम करणारे लोक त्यामुळे पराभूत होतात.
कुणाची तरी बायको, मुलगा जो कधीही काम करत नाही, असे लोक घरात बसून निवडून येतात. त्यामुळे चिन्ह पाहू नका. काम करणाऱ्यांना संधी द्या नाहीतर तुमच्या शहराचं वाटोळे होईल, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
