फळ विक्रेत्याकडून एक लाख रुपयांचे देशी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. कल्याणच्या मोहने रोड बंदरपडा कल्याण पश्चिम या ठिकाणी एक फळ विक्रेता देशी पेस्टल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत होता,अशी माहिती ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती.
फळ विक्रेता देशी पिस्टल घेऊन फिरतोय, खबऱ्याची पोलिसांना टीप, फिल्मी स्टाईलने कार्यक्रम
advertisement
त्यानुसार त्यांनी खातरजमा केली असता सचिन शिंदे नावाचा एक व्यक्ती देशी पिस्टल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत होता. त्याला पकडण्याकरिता ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा लावला. पण हा सचिन शिंदे सराईत गुन्हेगार असल्याने तो पोलिसांच्या हाताला लागत नव्हता. शेवटी ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने फिल्मी स्टाईलने त्याच्या मुसक्या आवळल्या.
सचिन शिंदे याच्यावरती धमकावणे, गंभीर इजा करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. संदीप शिंदे हा दहशत माजवण्याकरिता देशी पिस्टल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यासोबतच सचिन शिंदे याचे काही इतर गुंडांशी वैर असून त्यांच्यापासून जीवाला धोका होता, असे त्याला सतत वाटत होते. कधीही कोणीही आपल्यावर हल्ला करेल, असेही त्याला वाटे. त्यामुळे प्रत्युत्तरासाठी सचिन शिंदे देशी पिस्टल जवळ बाळगत होता.
आपल्याकडे देशी पिस्टल आहे, हे त्याने अनेकांना सांगितले होते. हे सांगून तो एकप्रकारे दहशत माजवायचा.हीच माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. दोन पिस्टल आणि काही काडतूसे घेऊन तो येणार आहे, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार सुनील दरमाळे यांनी कल्याणच्या रोशन किराणा स्टोअरच्या बाजूला बंदर पाडा कल्याण पश्चिम येथे सापळा लावून सचिनला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडे दोन गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक घोरपडे तसेच सुनील तारमाळे यांच्या टीमने ही कारवाई केली.
