ठाणे : उत्साह असेल तर माणसासाठी काहीही अशक्य नाही. असाच उत्साह नवी मुंबईतील ऐरोलीमधील आजीमध्ये पाहायला मिळत आहे. या आजींचे नाव सुमित्रा शिर्के असून त्यांचे वय 75 वर्षे आहे. या आजी मागील 13 वर्षांपासून स्वतःचा चायनीज भेळचा व्यवसाय करत आहेत. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 8 मध्ये या आजी चायनीज भेळची गाडी लावतात. याठिकाणी अनेक खवय्यांची कायम गर्दी असते. आजींच्या भेळच्या शेजवान चटणीची आणि सूपची चव ऐरोलीकरांना प्रचंड आवडते.
advertisement
सुमित्रा आजी यांनी हा व्यवसाय 13 वर्षांपूर्वी सुरु केला. यामध्ये त्यांच्या मुलांची सुद्धा त्यांना यात साथ लाभली. त्यांच्या या चायनीज भेळच्या दुकानात चायनीज भेळ, मंच्युरियन, मंच्युरियन ग्रेव्ही हे सगळे पदार्थ मिळतात. सुमित्रा शिर्के यांचं वय सध्या 75 वर्ष आहे. पूर्वी त्या एकट्या हे चायनीज भेळचे दुकान सांभाळायच्या. परंतु आता त्यांच्या तब्येतीमुळे त्यांचा मुलगा सुद्धा त्यांना यात मदत करतो.
MPSC मध्ये फेल बिझनेसमध्ये सक्सेस! 18 महिन्यात फेडलं बापाचं 12 लाखांचं कर्ज; कोणीही करेल हा व्यवसाय
विशेष म्हणजे लॉकडाऊन मध्ये जेव्हा लोक घरी बसून होते, त्यावेळेस या सुमित्रा आजींनी घरातल्यांना मदत म्हणून आपल चायनीज भेळचे दुकान चालूच ठेवलं. तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी कधीच हार मानली नाही. सुमित्रा आजींची सून स्वतः घरी मंच्युरियन चायनीज चटणी बनवते. त्यामुळे ऐरोलीकरांना ही चायनीज भेळ घरगुती वाटते आणि आवडते.
हॉटेलमध्ये वेटर म्हणून केलं काम, दोन जीवलग मित्रांनी घेतला हा निर्णय, महिन्याला इतकी कमाई
काय म्हणाल्या या आजीबाई -
'मी मागील 13 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे. माझ्या मुलाची आणि सुनेची सुद्धा मला यात मदत मिळते. मुलाला घर खर्चात हातभार लावला या उद्देशाने हा व्यवसाय मी करते आहे. सध्या वय झाल्यामुळे थकायला होतं. पण, घरात बसून राहण्यापेक्षा हे मला उत्तम वाटतं,' अशी प्रतिक्रिया सुमित्रा शिर्के या आजींनी व्यक्त केली.
आजींचा उत्साह भल्या भल्या तरुणांना मागे टाकेल, असाच आहे. त्या पूर्वीपासून कायमच गिऱ्हाईकांसोबत आनंदी राहून, चेहऱ्यावर हसू ठेऊन बोलतात. त्यामुळे गिऱ्हाईकांना सुद्धा त्या आपल्यातल्याच एक वाटतात. एखाद्यामध्ये जर उत्साह आणि निश्चय असेल तर तो काहीही करू शकतो, हे सुमित्रा आजींकडे पाहिल्यावर वाटतं.