कल्याण : शहरात कुठेही सेल लागला तर तिथे महिला वर्गाची मोठी गर्दी पाहायला मिळते. कल्याणमध्ये एक ठिकाण असेच आहे, जिथे कायम सेल लागलेला असतो. आज आपण याच सेलबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
कल्याणमधील अहिल्याबाई चौकात राजा हॉटेलच्या समोर एक साची म्हणून कपड्यांचे दुकान आहे. इथे मागील 3 वर्षांपासून सेल चालू आहे. हा सेल सकाळी 10 ते रात्री 10 चालू असतो. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ता, पंजाबी ड्रेसेस, गाऊन तसेच लेगिन्स मिळतात. टॉप्स आणि कुर्ते यांची किंमत 350 रुपयांपासून सुरू होते. तर पंजाबी ड्रेसचे पीस हे 350 ते 850 पर्यंत किमतीचे आहेत.
advertisement
आजकालच्या ट्रेंडी फॅशनमुळे आणि दररोज नवीन कपडे काय घालायचे, हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडलेला असतो. यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे ट्रेंडी ड्रेसेस मिळत आहेत. वेगवेगळ्या साईजमध्ये ड्रेस इथे उपलब्ध आहेत. साची दुकानाचे मालक सांगतात की, गेले तीन वर्ष झाले आमचा सेल सुरू आहे. दररोज आमचे 50 ते 60 ड्रेसेस असेच एका वेळी विकली जात आहेत. त्यामुळे आम्ही ठरवलं की हा सेल आम्ही असाच पुढे चालू ठेवणार आहोत. या सेलमुळे महिला वर्गाला स्वस्त दरात आम्ही ड्रेस देऊ शकू, असे ते म्हणाले.
इच्छा असेल तर मार्ग दिसेल! तीन तरुणांची कमाल, खडकाळ जमिनीवर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती
कल्याणमधील या साची दुकानातील ड्रेसेसने सध्या प्रत्येक महिला वर्गाला अगदी भुरळच घातली आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिझाईन, हल्ली नवीन आलेले प्रकार याठिकाणी मिळतात. पंजाबी ड्रेसेस, ड्रेस गाऊन लेगिन्सहेही त्यांच्याकडे मिळत आहेत. अनारकली आणि फिरता ड्रेस अशा प्रकारचे ड्रेसेसही याठिकाणी विकले जातात. या ड्रेसेसला जास्त मागणी मिळत असल्याचे ते म्हणाले.