सध्या बदलापूर शहरातून जाणाऱ्या कर्जत-मुंबई राज्य महामार्गावर अवजड वाहने आणि चाकरमान्यांची वाहतूक खूप वाढलेली आहे. भविष्यात होणरी कोंडी टाळण्यासाठी कात्रप ते खरवई रिंग रोडचे काम आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांमुळे एमएमआरडीएकडून सुरु करण्यात आले आहे. कात्रप ते ज्युवेली या तीन किलोमीटर लांबीच्या चार लेन रस्त्याचे काम आधीच सुरू होते.मात्र, ज्युवेली ते खरवईपर्यंतच्या रस्त्याचे काम काही काळ थांबले होते.
advertisement
अखेर काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे उर्वरित कामासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त केले गेले आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निविदा मंजुरीनंतर काम पुन्हा सुरु झाले आहे. यानुसार 37 कोटी रुपयांच्या निधीतून ही उर्वरित दीड किलोमीटर रस्ता येत्या वर्षभरात तयार होईल, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी भूमिपूजन प्रसंगी दिली.
या रिंग रोडमुळे कर्जत-मुंबई महामार्गावरून बदलापूर शहरातून जाण्याची गरज न पडता अवजड आणि लहान वाहने थेट वाडा मार्गावरून खरवई मार्गे पुढे पुणे तसेच मुंबई-बडोदा महामार्गावर पोहोचू शकतील. त्यामुळे पनवेल गाठणेही आता सोपे होणार आहे आणि वाहतूक कोंडीवर मोठा परिणाम होईल.