आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने हॉटेलचालकाला थेट पाया पडायला भाग पाडलं आहे. ही सगळी घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश लंके असं सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. तो अलीकडेच जामिनावर सुटला आहे. जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा दहशत निर्माण करण्यासाठी एका हॉटेल चालकाला मारहाण केली आहे. यानंतर हॉटेल चालकाने देखील दिनेश लंकेवर प्रतिहल्ला केला. यावेळी गुंडाने थेट खिशात ठेवलेल हत्यार दाखवून हॉटेल चालकाला पाया पडायला लावलं आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
advertisement
हा प्रकार घडल्यानंतर हॉटेल चालकाने कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून व्यापाऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. "भाईगिरीचं साम्राज्य संपवावं”, अशी मागणी हॉटेल व्यवसायिकांची पोलिसांकडे केली आहे. या घटनेचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.