काय आहे नेमकी घटना?
अजय म्हात्रे असे या तरुणाचे नाव असून पालिका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने रियल बीयर शॉपवर छापा टाकून एक्स्पायरी संपलेल्या बीयर बाटल्यांचा साठा जप्त केला .कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो परिसरातील रिअल बीयर शॉपमधून अजय म्हात्रे यांनी दोन बीयरच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. त्यातली एकच एक्सपायरी डेट संपलेलीबीयर प्यायल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली.
advertisement
कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उत्पादन शुल्क विभागाने दुकानावर छापा टाकून मोठा साठा जप्त केलामुदत संपलेली बिअर प्यायल्यानंतर प्रकृती खालावल्याची तक्रार उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानावर धाड टाकली.
तपासात दुकानात मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी डेट संपलेल्या बिअर साठा आढळून आला आहे. विभागाच्या अधिकाऱ्याकडून तो साठा ताब्यात घेण्यात आला आहे.या प्रकरणी संबंधित बिअर शॉप मालकावर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एक्सपायरी बिअर विक्रीबाबत उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे.तपासानंतर दुकानदारावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
