शेअर मार्केटमधून नफ्याचे आमिष
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची ही फसवणूक ऑगस्ट ते सप्टेंबर 2025 या कालावधीत घडली. तक्रारदार महिला कल्याणमधील खडकपाडा भागात राहते, तर तिचे पती एका कॉर्पोरेट कंपनीत कार्यरत आहेत. ऑगस्टमध्ये महिलेच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने कॉल केला, त्यांनतर त्याने स्वतःला शेअर बाजार गुंतवणुकीत तज्ज्ञ सांगत थोड्या दिवसांत चांगलाच नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
advertisement
आमिषाला भुलून गुंतवले लाखो रुपये
अवघ्या काही मिनिटांच्या बोलण्यावर महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि लाखो रुपयांती गुंतवणूक केली. मात्र, काही दिवसांनी ना नफ्याची रक्कम आली, ना मूळ पैसे परत मिळाले. त्यानंतर महिलेने त्या व्यक्तीस संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण समोरचा कोणताही प्रतिसाद न देताच तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
पोलिसांकडून तपास सुरू
फसवणुकीची तक्रार मिळताच खडकपाडा पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपीने वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक व्यवहार आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा पोलिसांकडून मागोवा घेतला जात आहे.
नागरिकांना पोलिसांचा इशारा
पोलिसांनी नागरिकांना अल्पावधीत जास्त नफा मिळवून देतो अशा गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
अनधिकृत वेबसाईट्स, लिंक किंवा अॅप्सवर विश्वास ठेवू नका तसेच कोणत्याही व्यक्तीस वैयक्तिक बँक माहिती देऊ नका असा ही सल्ला पोलिसांनी दिला आहे.
