कुणाची आहे गाडी?
डोंबिवलीच्या टिंबर मार्ट या दुकानाच्या कामासाठी या बैलगाडीचा वापर होतो. अल्ताफ पाटणवाला यांच्या मालकीचं हे दुकान आहे. न्यू भारत टिंबर येथे आलेल्या ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्या की त्या वस्तू टिंबर मार्ट येथून त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाव्या लागतात. बैल गाडीत सामान भरणे आणि ते पोहचवणे याची सर्व जबाबदारी बैल गाडी मालक पार पाडतात. त्यामुळे ट्रान्सपोर्टचा सर्व खर्च परस्पर बैल गाडी मालकाला द्या असे आम्ही ग्राहकांना सांगतो अशी माहिती पाटणवाला यांनी दिली.
advertisement
महाराष्ट्रातील 'बुलेटचं गाव' माहितीये का? नावामागं आहे खास कारण
1968 ते 70 दरम्यान आमच्याकडे दळण ळणासाठी जवळपास 17 बैल गाडी होत्या. त्यानंतर हळू हळू या बैल गाडी कमी झाल्या. इतकेच नव्हे तर पूर्वी डोंबिवलीतील आमच्या व्यतिरिक्त आणखी काही दुकानात दळण वळणासाठी बैल गाडी वापरत होते . मात्र चार पाच वर्षांपूर्वीच त्यांनी बैल गाडी वापरणे बंद केले. आता केवळ आम्हीच बैल गाडी वापरतो, असे पाटणवाला यांनी सांगितले.
किती येतो खर्च?
'एका बैलाला सांभाळण्यासाठी दिवसाला 200 रुपये खर्च येतो. पूर्वी हा खर्च केवळ 70 ते 80 रुपये होत होता. उन्हाळ्यात बैलांना हिरवा चारा मिळत नाही. त्यावेळी त्यांना दाणे खाऊ घालावे लागतात. हे दाणे आणखी महाग आहेत. तर पावसाळ्यात हिरवा चारा उपलब्ध होतो,' असे त्यांनी सांगितलं.
नाका कामगारांचं टेन्शन होणार दूर, ‘या’ पद्धतीनं घेता येईल सरकारी योजनांचा फायदा
आम्ही बैलांची काळजी घरच्या लेकरासारखी घेतो. उन्ह किंवा पाऊस असेल तर त्यांना झाडाच्या सावलीत उभं करतो. सकाळी लवकर उठून त्यांना चार-पाणी, आंघोळ घालून कामावर घेऊन येतो. कामावरुन घरी गेल्यानंतर पुन्हान्हा त्यांना खाण्यासाठी रानावर घेऊन जातो. त्यासाठी संध्याकाळी 3 तास वेळ द्यावा लागतो, असं पाटणावाला यांनी सांगितलं.
ट्रॅफिकमध्ये कस
ट्रॅफिकमध्ये रिक्षा चालक किंवा दुचाकीस्वार सांभाळून घेतात. बैल गाडी हाकायची इतक्या वर्षांची सवय असल्याने सहसा आमच्याकडून चूक होत नाही. मात्र कुठे चूक झाली तर काही जण ओरडतात ते आम्ही ऐकूनही घेतो. कधी आम्हाला त्रास झाला तरीही समोरच्याला सांगतो असे बैल गाडी मालक दशरथ बुवा खोरे यांनी सांगितले.
बैल गाडीतून सामानाची वाहतूक करणे सोपे जाते. बांबू मोठे असतात ते टेम्पो मध्ये बसत नहीत किंवा बसले तरी टेम्पोतून खाली पडू शकतात. यामुळे अपघात होऊ शकतात. मात्र बैल गाडी मध्ये हे बांबू व्यवस्थित बांधून त्यांची वाहतूक केली की वस्तू सुरक्षित हवे त्या ठिकाणी पोहचतात. बैल गाडीचे चाक मोठे असते त्यामुळे रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांचा फटका वस्तूंना बसत नाही असे पाटणवाला सांगतात.
चिखल महोत्सवात जाण्यापूर्वी 'हे' लक्षात ठेवा अन्यथा होतील गंभीर परिणाम
लवकरच होणार इतिहासजमा?
बैल गाडी चालवण्यासाठी गेल्या तीस वर्षात कोणीही नवीन व्यक्ती आलेली नाही. जे सात जण आहेत ते पूर्वीपासूनच गाडी हाकत आहेत. आता तेही वयस्कर झाले असून त्यांना गाडी हाकणे आणि बैलांची काळजी घेणे कठीण आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात बैल गाडी ही संकल्पनाच जाईल आणि बैल गाडी केवळ फोटोत दिसेल अशी खंत पाटणवाला यांनी व्यक्त केली.