कल्याण : पावसाळा आला की आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत, असा सल्ला दिला जातो. यासोबतच विविध आजारांसाठी वेगवेगळ्या थेरपी वापरल्या जातात. सध्या अंगदुखी, गुडघेदुखी, हेअर फॉल, पिंपल्स, फंगस यांसारखे आजार किंवा समस्याही अनेकांना जाणवत आहेत. त्यात नैसर्गिकरित्या औषध वापरून अंगदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखीवर त्याचा चांगला प्रभाव जाणवतो आहे.
advertisement
कल्याणमध्ये सानवी संघवी यांचे असेच एक नॅचरोपॅथीचे क्लिनिक आहे. कल्याणमधील न्यू मनीषा नगर, गजानन महाराजांच्या मंदिराच्या पुढे हे नॅचरोपॅथीचे क्लिनिक आहे. सानवी संघवी यांनी नॅचरोपॅथीमध्ये कोर्स केला आहे. तिथे नॅचरोपॅथीचे प्रोडक्ट्स मिळतात. त्यांच्या इथे मिळणारी प्रत्येक औषधे ही घरी बनवलेली आहेत. त्यांच्याकडे रुग्ण येतात आणि आपल्या आजाराबाबत सांगतात, त्यानंतर ते त्या रुग्णांना विशिष्ट प्रकारची वनस्पतीची औषधी बनवतात आणि त्यांच्या रुग्णांना देतात.
वडापाव अन् बर्गरचं अनोखं कॉम्बिनेशन, दादरमधील युनिक बडापाव स्टेशनची सर्वत्र चर्चा, हे आहे लोकेशन
याप्रकारच्या रुग्णांना मिळते सेवा -
यामध्ये त्यांच्याकडे गुडघेदुखीच नाही तर फंगससाठीच्या आजारावर उपचार करण्यासाठी जास्त रुग्ण येतात. तर यासोबतच हेअर फॉल तसेच ब्युटी टिप्स, ब्युटी प्रॉडक्टसाठी महिला वर्गांचा जास्त सहभाग दिसून येतो. महिला वर्ग याठिकाणी साबण, हेअरफॉलचे तेल घेण्यासाठी येतात. तर खूप जण वेटलॉसच्या औषधीसाठीही येतात.
कोल्हापूरची अनोखी नाईट लाईफ, दररोज रात्री होते याठिकाणी गर्दी, कारणही आहे खास
सानवी संघवी यांनी सांगितले की, माझ्याकडे सर्वात जास्त औषध गुडघेदुखी नाहीतर हेअर फॉलसाठी आणि फंगस रिमूव्ह करण्यासाठी येतात. सध्याच्या काळात वयस्कर लोक किंवा अगदी पन्नाशीत, चाळिशीतच अनेकांना गुडघेदुखी किंवा सांधेदुखीची समस्या जाणवत आहे. या सर्वांसाठी त्यांनी घरीच बनवलेले तेल उपलब्ध आहे आणि यामध्ये 2-3 दिवसातच त्यांना हा फरक जाणवायला लागतो. तर महिन्याभरातही हा फरक जाणवतो. त्यांचे प्रॉडक्ट्स हे पूर्ण महाराष्ट्र तसेच भारतभर विकले जातात.
सूचना - ही माहिती आरोग्य क्षेत्रातील तज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.