ठाणे : सध्या शॉर्ट कुर्तीचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती परिधान करायला आवडत आहे, असं म्हणायला हरकत नाही. सध्या तरुणींमध्ये मोठया प्रमाणात हा वेस्टर्न आणि कल्चरल लुक करण्यासाठी कसरत चालली आहे. त्यामुळे तरुणींनो जर तुम्हालाही हा ट्रेंडिंग लुक करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईतील ऐरोली स्थानकापासून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या गोल्ड कलेक्शन या दुकानात फक्त 200 रुपयांपासून शॉर्ट कुर्तीची विक्री केली जाते.
advertisement
जिद्द, चिकाटीच्या जोरावर तरुणाने उभारला फॅब्रिकेशनचा उद्योग, सोलापूरच्या रहिमानची प्रेरणादायी गोष्ट!
कोणत्या प्रकारच्या कुर्ती उपलब्ध -
या दुकानात तुम्हाला हव्या असणाऱ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रंगांच्या अशा शॉर्ट आणि लॉन्ग कुर्ती उपलब्ध आहेत. या सगळ्या कुर्ती कॉटनच्या असल्याने यांचा कापड चांगला आहे. म्हणूनच या गोल्ड कलेक्शन दुकानात गिऱ्हाईकांची गर्दी कायमच असते. शालिनी जयस्वाल या महिलेने तिच्या पती आणि मुलीसोबत मिळून चार वर्षांपूर्वी या गोल्ड कलेक्शन दुकानाच्या व्यवसायाला सुरुवात केली. ऐरोलीतील एक गोल्ड कलेक्शन कुर्ती शॉपमध्ये तुम्हाला चिकनकारी, अलाईन कुर्ती, लेस कुर्ती, सिल्क कुर्ती, अंगारखा कुर्ती,कॉटन कुर्ती, रेयोन कुर्ती, शॉर्ट कुर्ती, अनारकली कुर्ती, डिझायनिंग कुर्ती अशा 10 हून अधिक प्रकारच्या शॉर्ट आणि लॉन्ग कुर्ती उपलब्ध आहेत.
दुकानाची सुरूवात कशी झाली -
शालिनी जयस्वाल यांना पूर्वीपासूनच कपड्यांची आवड होती. मग ते खरेदी करणे असू दे किंवा दुसऱ्यांना सजेस्ट करणे. त्या आवडीने हे काम करायच्या. आपल्या आवडीचं काम आपल्याला करता आलं तर, हाच विचार करून शालिनी व त्यांची मुलगी तन्वी या जोडीने गोल्ड कलेक्शन नावाचे दुकान सुरू केले. याठिकाणी शॉर्ट कुर्ती व लॉन्ग कुर्ती स्वस्त दरात विकल्या जातात. शालिनी यांना तीन मुलं आहेत. त्या घरातली सगळी काम सांभाळून मुलांचं करून आपला व्यवसाय त्यांचे पती आणि मोठया मुलीसोबत खंबीरपणे चालवत आहेत.
दोन मैत्रिणींनी केला अनेक अडचणींचा सामना, पण न खचता आज याठिकाणी उभं केलं अनोखं स्वयंपाकघर
काय म्हणाल्या शालिनी जयस्वाल -
'मला तीन मुले आहेत. त्यांना सांभाळुन स्वतःची आवड जपणं सुरुवातीला थोड अवघड गेलं. परंतु नंतर माझ्या मुलांनी आणि माझ्या पतीने मिळुन हा व्यवसाय सुरु करण्यासाठी मला खूप मदत केली. ज्या महिलांना, मुलींना स्वस्त दरात कुर्ती हव्या असतील त्यांच्यासाठीच मी हे दुकान सुरू केलं आहे', असे गोल्ड कलेक्शन दुकानाच्या मालक असणाऱ्या शालिनी जयस्वाल यांनी सांगितले. त्यामुळे तरुणींनो जर तुम्हालाही नवीन नवीन शॉर्ट कुर्ती घालून ट्रेडिंग लुक करायचा असेल तर ऐरोलीतील या कलेक्शन दुकानाला नक्की भेट द्या.