Shocking Incident : खेळता खेळता घराचा मुख्य दरवाजा लॉक झाला अन् दोन चिमुकली...; मुंब्र्यातील ती भयानक दुपार
Last Updated:
Door Lock Incident News : पालकांनो ही चूक तुमच्या मुलांच्या जीवावर बेतू शकते, असं का म्हणत आहोत ते तुम्हाला मुंब्र्यातील घडलेल्या घटनेने समजेल.नक्की काय घडले आणि कधी घडले ते एकदा सविस्तर वाचा.
मुंब्रा : घराचा मुख्य दरवाजा अचानक लॉक झाल्याने घरात अडकलेल्या दोन चिमुकल्या मुलांची अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका करण्यात आली. दिवा-शीळ रोडलगत असलेल्या खर्डी गावातील एका इमारतीतील चौथ्या मजल्यावरील एका रुममध्ये ही घटना घडली.
खेळता खेळता दरवाजा लॉक झाला
रुही शिर्के आणि विहान शिर्के हे दोघेही अवघे सहा वर्षांचे भाऊ-बहिण घरात एकटेच होते. दरवाजा आतून लॉक झाल्याने ते बाहेर पडू शकले नाहीत. काही वेळातच मुलांच्या रडण्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू येताच त्यांनी तात्काळ पालकांना आणि संबंधित यंत्रणांना याबाबत माहिती दिली.
बंद घरातून वाचवण्यासाठी अख्खी इमारत धावली
घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी बोलवण्यात आले. जवानांनी परिस्थिती पाहता योग्य साधनसामग्रीच्या मदतीने दरवाजा उघडला. काही वेळातच दोन्ही मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
advertisement
अखेर रुही-विहान सुखरूप
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुटका झाल्यानंतर दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या वेगवान आणि योग्य कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 7:47 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking Incident : खेळता खेळता घराचा मुख्य दरवाजा लॉक झाला अन् दोन चिमुकली...; मुंब्र्यातील ती भयानक दुपार






