काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
आव्हाड म्हणाले, की अभंग विविध जाती धर्माच्या संतांनी लिहिल आहेत. जे विठ्ठलाचे परमभक्त आहेत. त्यांनी कधीच जातीभेद धर्मभेद केला नाही. परमेश्वराशी बोलायला आपल्याला कोणाची गरज नाही. आपण थेट परमेश्वरासोबत बोलू शकतो. एखाद्या संतांनी एखादा धर्माविषयी बोलणं हे निषेधार्थ आहे. यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत. निवडणुका देखील त्याच कारणामुळे पुढे ढकलल्या आहेत की त्यांना यश मिळणार नाही. मुंब्रामध्ये मुस्लिम बांधवांना शांत केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. राबोडीच्या दंगलीमध्ये मी जर मध्ये पडलो नसतो तर संपूर्ण मुंबई दुसऱ्या दिवशी पेटली असती.
advertisement
मुख्यमंत्री कोणाचं समर्थन करतात हे मला माहित नाही. परंतु दुर्दैवाने अशी आग लावणाऱ्यांचे समर्थन ते करतात हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. सामाजिक सलोखा राहायला हवा. मुख्यमंत्र्यांनी संविधानिक जबाबदारी घेतली पाहिजे. दोन्ही समाजाला एकत्र करायला हवं. त्यांना दिसते ओबीसी मराठा आपल्याबरोबर नाही. समाजामध्ये आपला विषयी प्रचंड राग आहे. आपण जे काही राजकीय वातावरण उठवलं आहे. सांस्कृतिक राजकीय संस्कृती त्याचा आपण वाटोळं केलं आहे. त्याला उपाय एकच हिंदू मुसलमान वाद.
वाचा - गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहिणीला 1500; उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
नितेश आणि जे काही बोलतात ते सरकारच्या परवानगीशिवाय बोलतात का? सरकार त्याची दखल घेत नाही. याचा अर्थ त्यांना सरकारच समर्थन आहे का? सत्ता येते जाते. पण एकदा मनं दुभंगली की ती परत जोडता जोडता आयुष्य निघून जाते. सत्ता आहे, अंतिम ध्येय नाही. आयुष्यात आपण राजकीय अरुणात आलो म्हणजे बसायला हवं हे गणित नाहीये आपण लोकांची मन जोडायला हवी, असा सल्लाही आव्हाड यांनी दिला.
