अंजली पांडे, असं या पीडित तरुणीचं नाव आहे. ती युपीएससीचा अभ्यास करते. अंजली यूपीएससीच्या क्लासवरून कल्याण पुर्व येथे येत होती. त्याचवेळी जे प्रभाग परिसरात काही अज्ञातांनी तिच्या अंगावर कॉस्टिक सोडा टाकला. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याचबरोबर काही वेळ तिला दिसेनासे झाले. याचाच अज्ञातांनी फायदा घेत तरुणीकडे असलेला बॅगेतील लॅपटॉप चोरी करून ते पसार झाले. दरम्यान थोड्यावेळाने या तरुणीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार दिली. सध्या तिला वैद्यकीय चाचणीसाठी कल्याणच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान हे चोरटे कोण होते? याचा पोलीस आता शोध घेत आहेत. मात्र रहदारीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
May 18, 2024 11:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
UPSC च्या विद्यार्थिनीवर कॉस्टिक सोडा टाकला अन्.. कल्याणमधील धक्कादायक प्रकार
