Mumbai Local ची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचं मोठं पाऊल, थेट 800 कार्यालयांना विनंतीपत्र!
सिडकोकडून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे बुधवार, दि. 9 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवारी, 11 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात द्रोणागिरी, उलवे, खारघर व तळोजा नोडमध्ये पाणी बंद राहील. तर 11 जुलैपासून काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन सिडकोने केले आहे.
advertisement
दरम्यान, उन्हाळ्यात देखील तळोजा, खारघर या भागात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये टँकरने पाणी विकत घ्यावे लागले होते. आता जलवाहिनीला मोठी गळती असल्याने देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
July 09, 2025 2:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Navi Mumbai: नवी मुंबईकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात पाणीबाणी, या भागात पुरवठा बंद
