या परिस्थितीवर पालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून अपेक्षित ती कठोर कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकुर्लीतील जागृत रहिवासी रुपेश राऊत आणि त्यांचे मित्रमंडळी पुढे आले आहेत. त्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी एक विशेष आरास सजवली आहे. या आरासातून ते प्रशासनाचे डोळे उघडे करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रवाशांना, नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत जनजागृती करीत आहेत.
advertisement
आरासामध्ये स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांनी ताबडतोब उभारलेल्या अतिक्रमणाचे चित्र तसेच फेरीवाल्यांचे व्यवस्थित न बसण्याचे प्रकार दाखवले आहेत. भाविकांची गर्दी या आरासाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. स्थानिक नागरिक म्हणतात की, हा आरास फक्त धार्मिक उत्सवापुरता मर्यादित नाही, तर यामध्ये सामाजिक संदेशही आहे. रेल्वे स्थानके फेरीवाले मुक्त, स्वच्छ आणि सुरक्षित व्हावीत.
रुपेश राऊत यांनी सांगितले की, ''आमच्या गणपती सजावटीतून आम्ही बाप्पाकडे प्रार्थना करतो की स्थानकांवर फेरीवाल्यांचा अतिक्रमण थांबावा. तसेच रिक्षा आणि टॅक्सींसाठी विमानतळासारखी व्यवस्था असावी, जेणेकरून प्रवासी सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि सोयीस्कर पद्धतीने प्रवास करू शकतील.''
स्थानिक रहिवासी आणि नागरिक आता अपेक्षा करतात की, केडीएमसी पालिका, ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिका या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देतील आणि प्रवाशांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुव्यवस्थित वातावरण निर्माण करतील.