TRENDING:

शाळेतून घरी जाताना घडलं आक्रित, 6 वर्षाच्या खादिजाचा बापासमोर तडफडून मृत्यू; भिवंडीत हळहळ

Last Updated:

भरधाव ट्रकने शाळकरी मुलीला घरी घेऊन निघालेल्या दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सहा वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नरेश पाटील, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

ठाणे:  भिवंडी शहरातली वंजारपट्टी नाका परिसरात भीषण अपघात झाला आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उड्डाणपुलावर भरधाव ट्रकने शाळकरी मुलीला घरी घेऊन निघालेल्या दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सहा वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या अपघाता वडील गंभीर जखमी झाले आहेत. खादिजा शेख असे मयत चिमुरडीचे नाव असून वडील डॉ.उमर शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाड्याकडून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक नदीनाका मार्गे भिवंडी शहरातून वंजारपट्टी नाका येथील डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम उड्डाणपुलावरून जात असताना हा अपघाच झाला आहे. नदीनाका परिसरातील फरीद बाग परिसरात राहणारे डॉ.डॉ.उमर शेख हे आपली सहा वर्षाची चिमुरडी खादिजा हिला निजामपूर येथील माझरीन इंग्लिश स्कूल या शाळेतून घरी दुचाकीवरून घेऊन जात असताना भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत चिमुरडी ट्रकच्या चाकाखाली आली .तर वडील विरुद्ध दिशेने पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

advertisement

ट्रक चालक ताब्यात

या अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ट्रक थांबवून ट्रक चालक सिराज कसुवर कुरेशी या ताब्यात घेतले. निजामपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होत चालकास ताब्यात घेत मृत खादिजा हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व.इंदिरा गांधी रुग्णालयात रवाना करत जखमी डॉ.उमर यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

advertisement

अवजड वाहनांची प्रवेश बंदी पुन्हा एकदा चर्चेत

भिवंडी शहरात अवजड वाहनांना बंदी असून वंजारपट्टी नाका परिसरात यामुळे नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत असून अनेक अपघात या उड्डाणपुलावर होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे शहरातील अवजड वाहनांची प्रवेश बंदी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दुचाकीवरून जाताना बाप लेकीचा आईच्या डोळ्या देखत मृत्यू

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

भिवंडीत दुचाकीवरून जाताना बाप लेकीचा आईच्या डोळ्या देखत मृत्यू झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी घडली होती. भिवंडी तालुक्यातील भोईरगाव हद्दीतील साईधाराजवळ ही घटना घडली. नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील सईम खोत (अंदाजे वय 48 वर्षीय)आणि मुलगी मरियम खोत ( अंदाजे वय 8 वर्षे) या बाप लेकीचा दुर्दैवी रित्या मृत्यू झाला होता. तर सुबी सहिम खोत ही गंभीर रित्या जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पडघ्या जवळील बोरिवली गावातील सहिम मकबूल खोत हे आपल्या पत्नी आणि मुलीसह दुचाकीवरून भिवंडीच्या दिशेने जात असताना, भोईर गावाच्या हद्दीतील साईधारा इथं पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली, या अपघातात बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुबी खोत या गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
शाळेतून घरी जाताना घडलं आक्रित, 6 वर्षाच्या खादिजाचा बापासमोर तडफडून मृत्यू; भिवंडीत हळहळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल