बनवलेले आईस्क्रीम, फालुदा, कुल्फी हे सर्व त्या घरगुती पद्धतीत बनवत असल्याने खाण्यासाठी अनेकांची गर्दी रोज बघायला मिळते. आईस्क्रीममध्ये वेगवेगळे फ्लेवर, कुल्फीमध्ये 25 फ्लेवर, फालुदामध्ये 15फ्लेवर अशा वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला इथे बघायला मिळतात. ग्रामीण भागातली एक महिला सगळ्याच बंधनावर मात करत आज हीच महिला स्वतःच्या जिद्दीवर लाखाच्या घरात उत्पन्न कमवतेय.
सुरुवातीला घरगुती टेलरिंग करत असलेल्या दिपाली आज आईस्क्रीम पार्लरची ऑनर होईपर्यंतचा प्रवास खूप कठीण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज असते परंतु त्यांच्या आयुष्यात मार्गदर्शक आणि गुरू या दोन्ही भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. आज त्या दोन शाखांच्या मालकिण आहेत. भविष्यात आईस्क्रीममध्ये अनेक वेगवेगळे फ्लेवर जे दुसऱ्या आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळणार नाहीत ते अनेक फ्लेवर बनविण्याचा प्लॅनिंग चालू असल्याने वर्षाच्या तिन्ही ऋतूत हा पार्लर मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
सुरुवातीला एक महिना रिस्पॉन्स कमी मिळत होता परंतु जस जशी ग्राहकांना चव माहिती झाली तसं तशी संख्या ही वाढू लागली. आज महिन्याला 2 ते 2.5 लाख या व्यवसायातून उत्पन्न कमावत असल्याचे त्यांनी संगितले. व्यवसायात चढ उतार तर आहेत पण या चढ उतारावर मात करत प्रत्येक महिलेने माझ्यासारखं सक्षम व्हायला हवं आणि भविष्यात माझ्या जगदंबा पार्लर प्रत्येक तालुक्यात होईल. त्यासाठी मी आणि माझा परिवार मेहनत घेत आहे, असे पवार यांनी सांगितले. फ्लेवर आणि ब्रँड तयार करून जगदंबा आईस्क्रीमची एक खासियत लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न ते असल्याचे सांगितले कारण लोकांची आवड निवड पाहूनच फ्लेवर आणि दर्जा वाढवत आहेत. यामुळे टिटवाळा मध्ये १६आईस्क्रीम पार्लरमध्ये जगदंबा आईस्क्रीम पार्लर प्रथम क्रमांकावर आहे.