ठाणे : सध्या लोक पुन्हा एकदा जुनी भांडी वापरण्यावर भर देताना दिसत आहेत. तांबे आणि पितळीची भांडी वापरल्यामुळे आरोग्य चांगले राहते. पूर्वी तर फक्त तांब्या किंवा पितळ्यांच्या भांड्यामध्ये जेवण बनवले जात असे. तुम्हालाही सुंदर तांब्याची आणि पितळीची भांडी हवी असतील आणि तेही अगदी स्वस्तात तर दादरमधील एक ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल.
advertisement
दादर स्टेशनपासून 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या शिवसेना भवनच्या जवळच हे 'द होम स्टोअर' नावाचे दुकान आहे. या दुकानात तांबे आणि पितळीची सगळी भांडी मिळतात. एक आजी आणि आजोबा मिळून हे दुकान चालवतात. 69 वर्षांचे रमेश सिंग आणि 62 वर्षांच्या शशी सिंग हे दोन्ही पती-पत्नी मागील 12 वर्षांपासून हे तांबे, पितळी आणि इतर सामान विकत आहेत.
Friendship Day 2024 : या 'फ्रेंडशिप डे'ला बनवा घरच्या घरी बॅण्ड, फारच सोपी आहे पद्धत, VIDEO
या दुकानात तुम्हाला तांबे, पितळ, दगडाच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू या सगळ्या वस्तू अगदी स्वस्त दरात मिळतील. 'आमच्याकडे मिळणाऱ्या भांड्यांची शुद्धता खूप महत्त्वाची आहे आणि आम्ही ती गेले 12 वर्ष जपत आहोत. आम्ही भांडी विविध राज्यातून आणतो,' अशी माहिती दुकानदार असणाऱ्या रमेश सिंघ यांनी दिली.
इथे मिळणारे तांबे आणि पितळीची टोप किंवा ताट अगदी सुंदर आहे. दादरमधील अनेक लोक इथूनच या सगळ्या गोष्टींची खरेदी करतात. देवासमोर ठेवला जाणारा कुंकवाचा करंडाही सुंदर पद्धतीने रंगवलेला आहे. याची किंमत तर फक्त 120 वीस रुपयांपासून सुरू होते. दादरच्या या 'द होम स्टोअर'मध्ये पितळीची वाटी, ग्लास, ताट, जरा, चाळणी त्यासोबत देवपूजेसाठी लागणारा सगळ्या वस्तू मिळतात.
त्यासोबतच जेवणाची सर्व छोटी, मोठी भांडी, बॉटल्स यांच्यात सुध्दा तुम्हाला इथे व्हरायटी मिळेल. यांची किंमत 50 रुपयांपासून सुरू होते. द होम स्टॉरमध्ये मिळणारे कास्याची भांडीदेखील दादरमध्ये प्रसिद्ध आहेत. तुम्हालाही जर घर सजावटीसाठी किंवा रोजच्या वापराकरिता तांबा आणि पितळाची भांडी हवी असतील तर दादरमधील या 'द होम स्टोअर'ला तुम्ही नक्की भेट देऊ शकतात.