Mumbai Rain Updates : विकेण्डला पुन्हा संकट? मुंबईकरांनो फिरायचा प्लॅन करण्याआधी वाचा हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:

पावसाचा इशारा लक्षात घेऊनच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचा किंवा सुट्टीचा आनंद घेण्याचा प्लॅन करावा, असे हवामान अभ्यासक एस. आर. खंडेलवाल यांनी सांगितले.

फाईल फोटो
फाईल फोटो
नारायण काळे, प्रतिनिधी
मुंबई : आज राज्यभर पावसाचा जोर कायम असणार आहे. विशेष करून मुंबई शहर आणि उपनगरात अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. आज शनिवार आणि उद्या रविवार असल्याने अनेक जण बाहेर ट्रिपला जाण्याचा विचार करत असतील. पण पावसाचा अंदाज इशारा आणि धोके लक्षात घेऊनच विकेंडसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान तज्ञांकडून करण्यात आले आहे.
advertisement
आठवडाभर राज्यातील पावसाचा जोर हा काहीसा कमी झाला होता. मुंबई शहर आणि उपनगरातही हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळाला. मात्र, सुट्टीचे दोन्ही दिवस शनिवार आणि रविवारी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण, बोरीवली, वसई-विरार इत्यादी ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Tamhini Ghat : ताम्हिणी घाटात रस्ता खचला, 5 ऑगस्ट पर्यंत वाहतूकीसाठी बंद
पावसाचा इशारा लक्षात घेऊनच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचा किंवा सुट्टीचा आनंद घेण्याचा प्लॅन करावा, असे हवामान अभ्यासक एस. आर. खंडेलवाल यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
पुणे आणि सातारा जिल्ह्याला पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईतही काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील पूर्व, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही हलक्यामध्ये स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटा सहवादळ सोसाट्याचा वारा आणि हलक्यातील मध्यम पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Rain Updates : विकेण्डला पुन्हा संकट? मुंबईकरांनो फिरायचा प्लॅन करण्याआधी वाचा हवामान विभागाचा अलर्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement