कल्याण : भारतात सध्या प्लस साईज ड्रेसेसची खूप मागणी असते. पण काही ठिकाणी ऑफलाइनमध्ये ही साईज मिळत नाही. त्यामुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईनच्या माध्यमातून लोक वस्तू मागवतात. यावर ठाणे जिल्ह्यातील कल्याण विभागात टिळक चौक येथे लाडकी स्टोअर्स यांनी उपाय काढला आहे.
लाडकी स्टोअर्स गेल्या सहा महिन्यांपासून 6XL ते 9XL या साईचे ड्रेस विकत आहेत. त्यांच्याकडे गेले 20 वर्षांपासून S size ते 5XL असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस, कुर्ताज, पंजाबी ड्रेसेस, गाऊन आणि trendig ड्रेसेसही मिळत असतात. आता त्यांनी मागील 6 महिन्यांपासून 6XL ते 9XL ही साईझही सुरू केली आहे. विशेष म्हणजे स्वस्त दरात याठिकाणी ते विक्री करत आहेत.
advertisement
जेवणानंतर पान खायचंय? तर मग हे आहे बेस्ट लोकेशन, ठाण्यातील या ठिकाणी होते मोठी गर्दी, दरही कमी
दुकानाचे मालक नितीन जसाने यांनी सांगितलं की, आपल्या शहरातील खूप जण हे तिथे बाहेरच्या देशात शिकायला जातात तर तिकडे त्यांना मॉडर्न ड्रेस नाहीतर इतर ड्रेसची गरज लागते. तेव्हा ते विद्यार्थी लाडकी स्टोअर्स मध्ये ते ड्रेस घ्यायला येतात. आम्ही देशाबाहेरही ऑर्डर पोचवतो आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला ऑर्डर मिळतात.
एकेकाळी डोईवर नव्हतं छत, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली थाटला संसार, आज शेतकऱ्याने फुलं विकून बांधला बंगला!
माझ्या दुकानात प्लस साईजचे ड्रेसही मिळतात. म्हणजेच बाहेरच्या शहरात जाण्यापेक्षा आपल्या शहरातच स्वस्त दरात ग्राहकांना त्यांचे आवडीचे ड्रेस मिळू शकतात, असेही त्यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले. आता त्यांच्याकडे मान्सून वेअर, ऑफिस वेअर तेसेच वेगवेगळ्या प्रकारच्या लेगिन्स, सलवार, ट्रॅक पॅन्ट, पलाजो हेही उत्तम मिळतात.