जेवणानंतर पान खायचंय? तर मग हे आहे बेस्ट लोकेशन, ठाण्यातील या ठिकाणी होते मोठी गर्दी, दरही कमी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
वेगवेगळ्या प्रकारचे गोड पान एका दुकानात मिळाले तर उत्तम म्हणजे लोकांना कुठेही फिरावं लागणार नाही, या उद्देशाने त्याने हे दुकान सुरू केले.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : जेवण झाल्यानंतर अनेकांना गोड खायला फार आवडतं. त्यांच्यासाठी डोंबिवली पूर्वेकडील रॉयल लिफ हे गोड पानांचे दुकान तर पर्वणीच आहे. डोंबिवलीतील या फॅमिली पान पार्लरमध्ये 15 हुन अधिक प्रकारची गोड पान मिळतात. वेगवेगळ्या प्रकारची पानांची व्हरायटी खाण्यासाठी फक्त डोंबिवलीतीलच नव्हे तर कल्याण कोपर या ठिकाणाहून देखील लोक येतात. डोंबिवलीतील हे रॉयल लिफचे दुकान डोंबिवलीकरांचे पहिल्या पसंतीचे दुकान आहे.
advertisement
संदीप गोरख गगनमले या तरुणाने सात वर्षांपूर्वी हे गोड पानांचे दुकान सुरू केले. वेगवेगळ्या प्रकारचे गोड पान एका दुकानात मिळाले तर उत्तम म्हणजे लोकांना कुठेही फिरावं लागणार नाही, या उद्देशाने त्याने हे दुकान सुरू केले. लग्न समारंभ, बर्थडे पार्टी या फंक्शनला सुद्धा त्यांच्या या गोड पानांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर या दोन फ्लेव्हरना गिऱ्हाईकांची अधिक पसंती आहे.
advertisement
कोणते कोणते फ्लेव्हर मिळतात -
या फॅमिली पान पार्लरमध्ये ब्ल्यूबेरी, चॉकलेट, मलाई कुल्फी, बटरस्कॉच, मगाई ट्विन्स, फ्रुट अँड नट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, पाइनॲपल, ब्लॅक करंट, कोलकत्ता मसाला, ऑरेंज या प्रकारचे 15 हून अधिक गोड पानांचे प्रकार आहेत. इथे फक्त 40 रुपयांना या व्हरायटीजमध्ये गोड पान मिळतात.
advertisement
एकेकाळी डोईवर नव्हतं छत, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली थाटला संसार, आज शेतकऱ्याने फुलं विकून बांधला बंगला!
हा होता हेतू -
'मी सात वर्षांपूर्वी या दुकानाला सुरुवात केली. लोकांना सगळ्या प्रकारच्या पानांच्या वरायटीज एकाच दुकानात मिळाव्यात हा माझा हेतू होता आणि या दुकानामुळे ते साध्य झालं. माझ्या दुकानातील चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी त्याचसोबत मीठा पान हे लोकांना फार आवडतात,' असे रॉयल लीफ दुकानाचे दुकानदार संदीप यांनी सांगितले.
advertisement
तुम्हालाही जर गोड पान जेवणानंतर खायला आवडत असेल आणि तुम्हाला व्हरायटीज वाले गोड पान हवे असतील तर तुम्हीही डोंबिवली पूर्वेतील या रॉयल लीफ म्हणजेच फॅमिली पान पार्लरला नक्की भेट देऊ शकतात.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
July 09, 2024 3:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
जेवणानंतर पान खायचंय? तर मग हे आहे बेस्ट लोकेशन, ठाण्यातील या ठिकाणी होते मोठी गर्दी, दरही कमी