एका पौराणिक कथेनुसार, एकदा गणपतीचं गजमुखासुर नावाच्या राक्षसाशी युद्ध झालं. गजमुखासुराला वरदान लाभल्यामुळे त्याला कोणत्याही शस्त्राने मारता येत नव्हतं. म्हणून गणपतीने आपला एक दात काढला आणि गजमुखसुरावर दाताने हल्ला केला. भीतीने गजमुखासुर उंदराचं रूप घेऊन पळू लागला. पण, गणपतीने त्याला आपल्या पाशात बांधलं. गजमुखासुराने गणपतीची माफी मागितली. यानंतर गणेपतीने गजमुखासुराला आपलं वाहन बनवून नवजीवन दिलं. तसेच, उंदीर हा अतिशय चंचल प्राणी मानला जातो. त्यामुळे त्याला चपळतेचं प्रतिक देखील मानतात.
advertisement
Ganpati Bappa Morya: आपण गणपती बाप्पा ‘मोरया’ असंच का म्हणतो? 99 टक्के लोकांना हे माहितच नाही!
आणखी एका पौराणिक कथेनुसार, गणपतीचं वाहन उंदीर होण्यामागे क्रौंच नावाच्या गंधर्वाची कथा आहे. गणपतीने त्याला रागाने शाप दिला होता त्यानंतर तो उंदीर बनला. गणपतीने क्रौंच गंधर्वाच्या उन्मत्त वृत्तीला लगाम घालण्यासाठी त्याला आपलं वाहन बनवलं होतं. यातून अहंकार आणि दुर्गुणांवर नियंत्रण मिळवण्याचा संदेश मिळतो.