याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीपूर्वी लहान आकाराचा नारळ 20 रुपयांना मिळत होता. सध्या तोच नारळ 30 ते 32 रुपयांपर्यंत मिळत आहे. देवीची ओटी भरण्यासाठी आणि धार्मिक विधींसाठी छोटा नारळ जास्त सोयीचा पडतो. त्यामुळे ग्राहकांकडून या नारळाची मागणी वाढली आहे. लहान नारळाची मागणी जास्त आणि आवक कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे दर वाढले आहेत.
advertisement
Sabudana Kheer Recipe : नवरात्रीच्या उपवासात खा 'हा' ऊर्जेने भरपूर गोड पदार्थ, दिवसभर राहाल फ्रेश..
याउलट मोठ्या नारळाचे दर मात्र घसरले आहे. काही दिवसांपूर्वी 50 रुपयांना विकला जाणारा मोठा नारळ सध्या 40 रुपयांना मिळत आहे. दक्षिण भारतातून मोठ्या नारळाचा पुरवठा जास्त आहे. त्या तुलनेने मागणी कमी असल्याने दर घटल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्रात दक्षिण भारतातून विशेषतः आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधून नारळाची आवक होते. महाराष्ट्रातही नारळ उत्पादन होत असले तरी, सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने आणि आवक कमी झाल्याने दक्षिण भारतातील राज्यांकडून नारळाची आयात करावी लागते. सध्या मोठ्या नारळांची आवक जास्त आहे.